मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅमरून डियाझने नुकताच तिचा ४५वा वाढदिवस साजरा केला. कॅमरून ही हॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. कॅमरूनने १९९४ मध्ये डेब्यू केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता तिने सिनेमात काम करणं सोडलं आहे. पर्सनल लाईफ संपल्याच्या कारणाने तिने सिनेमात काम करणं सोडलं आहे. शेवटचा सिनेमा तिने २०१४ मध्ये केला होता. कॅमरून ही एका सिनेमासाठी तब्बल ९५ कोटी रूपये घेत होती.  


कॅमरूनचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. १६व्या वर्षी ती फॅशन विश्वात मॉडल म्हणून लोकप्रिय झाली. १९९२ मध्ये तिने एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. मात्र, हा फोटो कधीही रिलीज झाला नाही. त्यानंतर २१ व्या वर्षी तिने ‘द मास्क’ या सिनेमात पहिल्यांदा काम केलं. या सिनेमासाठी तिने ऑडिशन दिलं होतं. या सिनेमातील कामामुळे ती रातोरात स्टार झाली होती. १९९४ मध्ये सर्वात जास्त कमाई करणा-या सिनेमात हा सिनेमा येतो. त्यानंतर तिने ‘द लास्ट सपर’, ‘फिलींग मिनेसोटा’, ‘किज टू तुलसा’, ‘अ‍ॅनी गीवन संडे’, ‘चार्ली एंजल्स’, ‘द इनव्हिजिबल सर्कस’, ‘द हॉलिडे’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. 


अनेकांसोबत अफेअर्स -


१९९० ते १९९४ पर्यंत ती व्हिडिओ प्रोड्यूसर कार्लोस डे ला टोरीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत तिचे अफेअर होते. २०१५ मध्ये तिने बेंजी मॅडेनसोबत लग्न केलं.


१३ कोटींचा बंगला -


कॅमरूनने लग्नानंतर पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये तब्बल १३ कोटींचा बंगला विकत घेतला. २४३८ स्क्वेअर फूट इतक्या परिसरात असलेल्या या बंगल्याचं निर्माण १९६४ मध्ये करण्यात आलं होतं. 


७६७ कोटींची प्रॉपर्टी -


कॅमरून एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती, फॅशन मॉडल आणि लेखिका आहे. तिच्याकडे तब्बल ७६७ कोटींची प्रॉपर्टी आहे. २०१० मध्ये फोर्ब्सने १०० श्रीमंत महिला सेलिब्रिटीजमध्ये तिचं नाव दिलं होतं. या यादीत ती ६०व्या नंबरवर होती.