मुंबई : प्रेम करतो चोरी नाही... अशाच अविर्भावानं गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय सेलिब्रिटी तिच्या प्रियकरासोबतचं नातं सर्वांसमोर आणताना दिसत आहे. पतीपासून वेगळं झाल्यानंतर ही सेलिब्रिटी तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या सोशल मीडिया पोस्ट करु लागली. (Hollywood Actress model Kim Kardashian kisses boyfriend Pete Davidson watch viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तर तिनं हद्दच केली. आतापर्यंत प्रियकरासोबतचे इंटिमेट फोटो पोस्ट करणाऱ्या या सेलिब्रिटीनं थेट तिचा एक प्रायव्हेट व्हिडीओच सर्वांसमोर आणला. प्रियकराला जाहीरपणे Kiss करणारी आणि त्याच्यावरील प्रेम व्यक्त करणारी ही सेलिब्रिटी आहे, किम कार्दशियन. (Kim Kardashian)


एकमेकांना शोभून दिसावं म्हणून एकसारख्याच रंगात केस रंगवणारी ही जोडी, किम आणि पेटे डेविडसन आता त्यांच्या नात्याची जागोजागी कबुली देताना दिसत आहेत. विविध कार्यक्रम असो किंवा मग एखादी डेट. 


किम आणि पेटे कधीच एकमेकांपासून दूर दिसत नाहीत. 2021 नोव्हेंबर पासून हे दोघंजण रिलेशनशिपमध्ये आहेत. यानंतर मार्च महिन्यात त्यांनी हे नातं सर्वांसमोर आणलं. तेव्हापासून काही ही जोडी एकमेकांहून वेगळी दिसतच नाही. 




किम यापूर्वी तिच्या आणि ये अर्थात कान्ये वेस्ट याच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. येसोबत असणारं तिचं नातं Talk of the town सुद्धा होतं. पण, नेमक्या गोष्टी चुकल्या आणि अखेर त्यांच्यामध्ये दुरावा आला.