नवी दिल्ली : कलाकार आणि लोकप्रियता याचं अनोखं नातं आहे. लोकप्रियतेचं हे गणित अचूक साधलं ते म्हणजे शाहरुख खानने. बॉलिवूडच्या किंग खानवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. त्याच्यासाठी अनेक मुली वेड्या आहेत. त्याची एक झलक बघण्यासाठी तरुणी आतुर असतात. त्याचा चाहतावर्ग खास आणि वेगळा आहे. अशीच एक तरुणी त्याच्यासाठी वेडी असून त्याला भेटण्यासाठी अतिशय आतुर होती. ती स्वतः एक अभिनेत्री असून अनेकांच्या मनावर ती राज्य करते. त्या अभिनेत्रीचं नाव आहे नतालिया वोडायनोव्हा. (Natalia Vodianova)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या ‘वोग’ पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री नतालियाला शाहरुखला भेटण्याची संधी मिळाली. आणि तिच्या आनंद गगनात मावेना  झाला. हाच आनंद नतालियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्यक्त केला. इतकंच काय, तर खूप पूर्वीपासून आपल्याला शाहरुख खूप जास्त आवडत असल्याचंही तिने कबुल केलं.


त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये नतालियाने लिहिलं, “काल रात्री मला माझ्या ‘क्रश’ला, बॉलिवूडच्या ‘किंग’ला भेटण्याची संधी मिळाली. ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’ या त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्यावरील प्रेमामुळे मी भारताबद्दलची स्वप्नं  पाहू लागले होते. आज त्याची प्रत्यक्षात भेट घेतल्याचा आणि त्याला ‘वोग एण्टरटेनर ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिल्याचा मला फार आनंद होत आहे.’ नतालियाने या कॅप्शनमध्ये शाहरुखच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचीही प्रशंसा केली. त्यासोबतच त्याचे मनापासून आभार देखील मानले.



आपल्या या अनोख्या ‘सेलिब्रिटी चाहती’ला भेटल्यानंतर किंग खानलाही फार आनंद झाला असणार यात शंकाच नाही. नतालिया वोडायनोव्हा ची भेट आणि तिचं शाहरुख आणि त्याचा चित्रपटांच्या प्रेमात असणं, हे सगळं खुद्द शाहरुखसाठी देखील सरप्राईजच असेल.