Hollywood Singer Jake Flint dies : हॉलिवूडचा प्रसिद्ध कंट्री गायक जेक फ्लिंटचे (Jake Flint) निधन झाले आहे. वयाच्या 37 व्या वर्षी जेकनं अखेरचा श्वास घेतला. (Jake Flint Death At The Age Of 37) 26 नोव्हेंबर रोजी तो लग्न बंधनात अडकला होता. त्यानंतर काही तासातच झोपेत असतानाचा त्यानं जगाचा निरोप घेतला. त्याच्या आकस्मिक निधनानंतर त्याची पत्नी ब्रेंडा आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, जेकच्या मृत्युचे कारण अजून समोर आलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेक फ्लिंट हा ओक्लाहोमाचा रहिवासी होता. सिंगरच्या पब्लिसिस्ट क्लीफ डॉयलनं त्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तर जेकच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला खूप मोठा धक्का बसला आहे. (Jake Flint wedding) ब्रेंडाने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत पतीच्या निधना विषयी बोलताना म्हणाली, आपण आता आपल्या लग्नाचे फोटो पाहायला हवे होते, पण या क्षणी मला माझ्या पतीला कोणत्या कपड्यांमध्ये पुरायचे याचा विचार करवा लागत आहे. लोकांना असं दुख: मिळायला नको. माझं प्रेम गेलं आणि मला त्याची गरज आहे. तो परत आला पाहिजे हिच माझी इच्छा आहे. मी हे सहन करू शकत नाही. मला तो परत पाहिजे.' (Jake Flint wife)


पाहा जेकच्या पत्नीची पोस्ट 



जेक फ्लिंटचा मित्र आणि माजी मॅनेजर ब्रेंडा क्लाइननेही त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. ब्रेंडानं सांगितलं की जेक तिच्या मुलासारखा होता. त्याचं असं मध्ये सोडून जाणे ही मोठी शोकांतिका आहे. जेक फ्लिंट यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते त्याला आठवत आदरांजली वाहत आहेत. 



जेक फ्लिंटनं 2016 मध्ये गायक म्हणून पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या अल्बमचं नाव आय एम नॉट ओके (I'm Not OK) होतं. त्याचा दुसरा अल्बम 2020 मध्ये आला, ज्याला त्यानं स्वतःचं नाव दिले. त्याचं फायरलाइन, व्हॉट्स युवर नेम ही गाणी बरीच प्रसिद्ध झाली.