Shooting चा अट्टहास अभिनेत्रीला महागात, पोटचं बाळही गमवावं लागलं
अरेरे, बाळाच्या जन्मासाठी उत्सुक असतानाच तिला पाहावं लागले इतके वाईट दिवस
मुंबई : एखादी महिला जेव्हा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाच्या जन्माची वाट पाहत असते, तेव्हा ती अप्रत्यक्षपणे दुसऱ्या जन्माच्या नजीक जाताना दिसते. मातृत्त्वाचं सुख वाट्याला येणं म्हणजे जणू एक वरदान. पण, हा प्रवास काही सोपा नसतो. अनेकदा काही महिलांना (miscarriage) गर्भपाताचाही सामना करावा लागतो. एका आघाडीच्या अभिनेत्रीलाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एकदा नव्हे, तब्बल दोन वेळा या अभिनेत्रीनं गर्भातील बाळ गमावलं होतं. तिच्यासाठी तो काळ बराच आव्हानात्मक होता.
एकाएकी चर्चेत येणारी ही अभिनेत्री आहे, Jennifer Lawrence. तिनं यावेळी महिला आणि पुरुष कलाकारांना मिळणारं श्रेय आणि त्यांच्या मानधनात असणारी तफावत या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. एका अतिशय लोकप्रिय मासिकाशी संवाद साधताना जेनिफरनं आपलं मत मांडलं. ओघाओघानं तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयीसुद्धा बोललं जाऊ लागलं.
दोन वेळा गर्भपात...
आपण दोन वेळा गर्भपाताचा सामना केला, असंही जेनिफरनं या मुलाखतीत सांगितलं. अवघ्या 20 व्या वर्षी ती गरोदर होती. पण, 'डोन्ट लुक अप' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, तिला बाळ गमवावं लागलं होतं.
'मी त्यावेळी गरोदर होते. मी तेव्हा आराम करत होते. शरीरात बरेच बदल होत होते. मी त्या काळाचा आनंद घेत होते. आयुष्याचा प्रत्येक क्षण बदलत होता. अनेकदा तर, मी विचार करत होते की कुणी मला हेस सर्व करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला तर...', गर्भपातानंतर काळात जेनिफरनं ज्या परिस्थितीचा सामना केला, ती परिस्थिती कोणत्याही महिलेच्या वाट्याला यायला नको, असंच चाहत्यांचं म्हणणं.
वाचा : आता वाईट Cholesterol वाढणार नाही; आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
जेनिफरच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर, ती 2016 मध्ये विवाहबंधनात अडकली होती (Jennifer Lawrence husband). 2007 पासून ती कलाजगतामध्ये बरीच सक्रिय आहे. 'द बिल इंगवॉल कॉमेडी शो'पासून तिनं करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये तिनं एका मानसोपचारतज्ज्ञाच्या मुलीची भूमिका साकारली होती.