मुंबई : सेलिब्रिटी, त्यांची घरं आणि त्यांचं राहणीमान या साऱ्याचं चाहत्यांना कायमच कौतुक वाटत असतं. त्यातच एखाद्या लोकप्रिय सेलिब्रिटीप्रती कुतुहलाची ही पातळी जरा जास्तच. सध्या असंच कुतूहल पाहायला मिळत आहे जस्टिन टिंबरलेक (Justin Timberlake) या ह़ॉलिवूड सेलिब्रिटीबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारणही तसंच आहे. जस्टिन टिंबरलेक (Justin Timberlake) आणि त्याची पत्नी  जेसिका बेल (Jessica Biel)यांनी न्यूयॉर्क येथे असणारं त्यांचं आलिशान घर विकलं आहे. 


पाच वर्षांपूर्वी या जोडीनं हे पेंटहाऊस खरेदी केलं होतं. तेव्हा त्याची किंमत 20.2 मिलियन डॉलर, म्हणजेच भारतीय परिमाणानुसार 150 कोटी रुपये इतकी होती. 


5,375 चौरस फूट इतकं क्षेत्रफळ असणाऱ्या या पेंटहाऊसमध्ये सध्या जस्टिन त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. 


सूत्रांच्या महितीनुसार सध्या त्यानं हे पेंटहाऊस 29 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 215 कोटी रुपयांना विकलं आहे. 



घराच्या विक्रीचा दर इतका, की यामध्ये 'बाहुबली'सारखा एक आणि त्याच बजेटमध्ये दोन चित्रपटही साकारले जाऊ शकतात. 


जस्टिनच्या या पेंटहाऊसमध्ये पूल, रुप डेक असा सुविधा आहेत. शिवाय इथून सिटी व्हूसुद्धा दिसतो. 


हे घर विकल्यानंतर जस्टिन आणि त्याच्या कुटुंबाचा नवा आशियाना कुठे असेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण, सहाजिकच त्याची उत्सुकताही चाहत्यांना लागून राहिली आहे. 


जस्टिन हा एक लोकप्रिय हॉलिवूड गायक आहे. त्यानं बरीच गाजलेली गाणी गायली आहेत. ज्यामध्ये, 'मिरर्स', 'लव नेवर फेल्ट सो गुड', 'माय लव' या आणि अशा इतरही गाण्यांचा समावेश आहे. 


फक्त गायन नव्हे, तर अभिनय क्षेत्रातही त्यानं आपला ठसा उमटवला आहे. सध्या मात्र हा हरहुन्नरी चेहरा त्याला घराच्या बदल्यात मिळणाऱ्या घसघशीत रकमेमुळंच प्रकाशझोतात आला आहे.