`टायटॅनिक` फेम अभिनेत्याचं निधन, चाहत्यांना धक्का
ही झुंज अपयशी ठरली आणि ...
मुंबई : चित्रपट प्रेमींच्या यादीमध्ये बरीच लोकप्रियता मिळालेला एक चित्रपट म्हणजे, 'टायटॅनिक'. एका महाकाय क्रूझ आणि त्याभोवती असणाऱ्या कथानकावर, प्रेमकहाणीवर भाष्य करणारा हा चित्रपट. अशा या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पण, याच कलाकारांपैकी एकानं जगाचा निरोप घेतला. (Hollywood movie titanic and the omen actor david warner dies)
या अभिनेत्याचं नाव, डेविड वॉर्नर. गेल्या काही काळापासून डेविड कर्करोगाशी झुंज देत होते. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेचा श्वास घेतला.
Titanic या चित्रपटामध्ये त्यांनी स्पाइसर लवजॉय ही भूमिका साकारली होती. वॉर्नर यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. 24 जुलै रोजी लंडनमध्ये त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं.
70- 80 च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवली....
वॉर्नर यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. 'लिटिल मॅल्कम', 'ट्रॉन', 'टाइम बँडिट्स', 'स्टार ट्रँक' आणि 'द फ्रेंच लिटिल वुमन' या आणि अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
सोशल मीडियावर त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच चाहते आणि कला जगतातील अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली.