मुंबई : बऱ्याचदा सेलिब्रिटींना अगदी जवळून पाहिल्यानंतर किंवा त्यांना भेटल्यानंतर चाहत्यांची एकच प्रतिक्रिया असते. ती म्हणजे भारावल्याची. ज्या व्यक्तीला आपण मोठ्या पडद्यावर, टीव्हीमध्ये, पोस्टर बॅनरवर किंवा मग सोशल मीडियावर पाहतो, त्याच व्यक्तींना भेटल्याचा आनंद म्हणजे शब्दांतही व्यक्त करता येणार नाही असाच असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांनाच या सेलिब्रिटींचा आणि त्यांच्या जगण्याचा कायमच हेवा वाटतो. पण हे आपल्याला हेवा वाटणारी हीच प्रसिद्धी मिळवण्यासाठी सेलिब्रिटींना जी किंमत मोजावी लागते त्याचा विचारही करता येणं निव्वळ अशक्य. 


हेच वास्तव समोर आणलं आहे हॉलिवूड विश्वावर राज्य करणाऱ्या जेनिफर लोपेज हिनं. एका लघुपटाच्या निमित्तानं तिचा हा प्रवास आणि त्यातील खाचखळगे सर्वांना पाहण्याची संधी मिळत आहे. (Jennifer Lopez Documentary)


गायक आणि लोकप्रिय अभिनेत्री अशा दुहेरी भूमिका साकारत असताना जेनिफरला नेमकी कोणती आणि किती आव्हानं आली याची लहानशी झलक तिच्या लघुपटाची लहानशी झलक दाखवून जात आहे. (Jennifer Lopez Documentary netflix)


प्रत्येकवेळी कॅमेऱ्यासमोर परफेक्ट दिसण्यासाठी खासगी आयुष्यात कितीही उलथापालथ होवो, पण तिथं सर्वांसमोर मात्र कोणतंच कारम चालत नाही हेच ती सांगताना दिसते. (Jennifer Lopez )


सोशल मीडियावर उडवली जाणारी खिल्ली, कमरेखालच्या कमेंट्स आणि यामुळं आत्मविश्वास कोलमडून गेलेला असतानाही पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहण्याचं कसब आपण कसं आजमावतो हे या व्हिडीओतून जेनिफरमुळं कळतं. 


काहीतरी चांगली कलाकृती प्रेक्षकांपुढे सादर करतेवेळी शरीरप्रदर्शनापुरताच मर्यादित न राहण्यासाठी म्हणून जीवाच्या आकांतानं आपल्या मागण्या पुढे करणारी जेनिफर पाहताना, कलाकार होणं सोपं नाही याचीच जाणीव होते. 


 
जेनिफरची तीन लग्न 
बेन एफ्लेक आणि जेनिफरनं 2002 मध्ये एकमेकांना डेट केलं तेव्हाच त्यांचा साखरपुडाही झाला. पण, दोन वर्षांनंतरच ते  वेगळेही झाले. तिसऱ्या लग्नाच्या नात्याला तडा गेल्यानंतर बेनसोबत तिची जवळीक पुन्हा वाढली. 


 


सध्या ती बेनलाच डेट करतेय. विविध पुरस्कार सोहळे, पार्टी आणि कार्यक्रमांना ती आवर्जून हजेरी लावत आहे. येत्या काळात ते लग्न करणार असल्याचीही चिन्हं आहेत. त्यामुळं असं झाल्यास हे जेनिफरचटं चौथं लग्न असेल.