मुंबई : वाढदिवसाची वाट तुम्ही आम्ही सगळेच पाहत असतो. पण, एका सुपरस्टारला या दिवसाची प्रतीक्षा असतानाच साधारण आठवड्याभरापूर्वीच त्याच्यावर काळानं घाला घातला. 72 वा वाढदिवस साजरा करण्याआधीच या अभिनेत्याचं निधन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलियम हर्ट (William hurt) असं या अभिनेत्याचं नाव. 13 मार्च रोजी या ऑस्कर पुरस्कार विजेत्या अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलानं याबाबतची माहिती दिली. 


अखेरच्या क्षणी त्यांनी कोणालाच जरासाही त्रास दिला नाही. त्यांच्या ज्याण्यानं एक कुटुंब म्हणून आम्हाला धक्का बसला. ज्यामुळं सध्या आम्हाला काही काळ एकांताची अपेक्षा आहे. 


हॉलिवूडमधील काही प्रतिष्ठीत आणि गाजलेल्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये विलियम हर्ट यांचं नाव घेतं जातं. त्यांच्या जाण्याच्या बातमी चाहता आणि कलाकार वर्गाला हादरवून सोडलं. 



बऱ्याच आव्हानात्मक भूमिका साकारत त्यांनी विज्ञान आणि काल्पनिकतेवर आधारित चित्रपटांमध्ये काम केलं. आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत काम करणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. 


2018 मध्ये त्यांना टर्मिनल प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाल्याचं निदान झालं. ज्यानंतर त्यांची तब्येत काहीशी खालावली. विलियम आणि त्यांचं खासगी आयुष्यही कायम चर्चेचा विषय ठरत होतं. 


तूर्तास या अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतल्यामुळं सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.