मुंबई : हॉलिवूडमधील काही चित्रपटांना भारतातही चांगलीच प्रेक्षकपसंती मिळाली. अशा चित्रपटांची यादी तशी मोठी. पण, लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या चित्रपटाचं नाव घ्यायचं झालं, तर Home Alone हे नाव डोक्यात येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरात एकट्या असणाऱ्या मुलानं चोरांनाच सळो की पळो करून ठेवलं काय आणि तो लोकप्रिय झाला काय. 


आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला, की लगेचच एका ठिकाणी दुकान थाटून बसणारे आपल्यापैकी कित्येकजण असतील. 


या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या लहानग्या केविनला कोणीही विसरु शकलेलं नाही. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं वेड आजही कायम आहे. 


एकाएकी हा चित्रपट चर्चेत यायचं कारण म्हणजे, केविन. अर्थात अभिनेता Macaulay Culkin. हाच चिमुरडा वयाची 40 ओलंडून 41 वर्षांचा झाला आहे. 


इतकंच काय, तर आता तो गोड गोंडस नाही तर चार्मिंग हँडसम दिसत आहे. Macaulay नं नुकताच त्याची प्रेयसी ब्रेंडा साँग हिच्याशी साखरपुडा केला आहे. 


कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्स येथे नुकतंच यांना हातातली अंगठी कौतुकानं दाखवताना पाहिलं गेलं. 


41 वर्षीय Macaulay Culkin 33 वर्षीय ब्रेंडाला  `Changeland` च्या सेटवर थायलंडमध्ये भेटला. पुढे त्यांना डिनर डेटला एकत्र पाहिलं गेलं. 


त्यानंतर ब्रेंडानं एक फोटो पोस्ट केला, त्याचही तो दिसला होता. जवळपास चार वर्षे या जोडीनं एकमेकांना डेट केलं. मागच्याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी या नात्यात एका बाळाचं स्वागत केलं. 



डकोटा असं ब्रेंडा आणि Culkin च्या मुलाचं नाव. Culkin च्या दिवंगत बहिणीच्या नावावरून या जोडीनं त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं असं म्हटलं जातं.


असं असलं तरीही ही जोडी त्यांचं हे नातं आणि खासगी आयुष्यातील बऱ्या गोष्टींबाबत गोपनीयता पाळताना दिसते. पण, Culkin च्या 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ब्रेंडाच्या पोस्टनं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. 



सध्या त्यांच्या नात्याबद्दलची अधिक माहिती अद्यापही गुलदस्त्यात असली तरीही अनेक दिवसांनंतर हा अभिनेता एका आनंदाच्या बातमीसह सर्वांसमोर आल्याचाच चाहत्यांना आनंद आहे.