मुंबई : कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होममिनिस्टरमध्ये लवकरच अशा 'सौं' ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्यांचे ‘अहो’ विठ्ठलाच्या चरणी सेवा अपर्ण करणारे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. भाऊजींनी आळंदी, जेजुरी, नातेपुते, वाखरी आणि पंढरपूर या ठिकाणी रथचालक, चोपदार, वारकरी मंडळींना आयुर्वेदिक औषधं व जेवण देऊन मदत करणारे तसेच रखुमाई आणि विठ्ठल मंदिराचे पुजारी यांच्या कुटुंबाना भेट देणार आहेत. त्यांचासोबत पैठणीचा अनोखा खेळ देवाच्या दारी रंगणार आहे. 



तेव्हा आषाढी एकादशी निमित्त खास होमी मिनिस्टर वारी विशेष भाग पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता फक्त झी मराठीवर!!!