Honey Singh On His Song : लोकप्रिय सिंगर आणि रॅपर हनी सिंग (Honey Singh) त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत राहतो. आता हनी सिंग त्याच्या एल्बम 3.0 मुळे चर्चेत आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या हनी सिंगनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. हनी सिंगनं नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला होती की चैन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील लूंगी डान्स हे गाणं किंग खान म्हणजे शाहरुख खानला आवडलं नव्हतं. याशिवाय हनी सिंगनं त्याच्या गाण्यांमध्ये महिलांसाठी अपमानास्पद शब्द असतात त्यावर वक्तव्य केलं आहे. हनी सिंग म्हणाला, गाण्यांमध्ये महिलांसाठी अपमानास्पद शब्द असते तर कोणी त्याला त्यांच्या मुलींच्या लग्नात परर्फॉर्म करण्यासाठी बोलावलं नसतं असं म्हटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनी सिंगनं नुककीत पिंकव्हिलाला मुलाखत दिली होती. यावेळी हनी सिंगनं वक्तव्य केलं की असं असतं तर लोकांनी माझी गाणी का ऐकली असती? जर माझ्या गाण्यांमध्ये महिलांसाठी अपमानास्पद शब्द असते तर कोणी मला त्यांच्या मुलींच्या लग्नात परर्फॉर्म करायला का बोलावतील? बरेच भाऊ-बहीण माझ्या गाण्यांवर डान्स करतात. माझ्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये मी अनेक लग्नांमध्ये परर्फॉर्म केलं आहे. काकू असतात त्या स्टेजवर येतात आणि माझ्यासोबत आंटी पुलिस बुला लेगीवर डान्स करतात. जसं म्हटलं जातं तस मुळीच नाही आहे. 



हनी सिंग याविषयी बोलताना पुढे म्हणाला, " शिक्षणामुळे लोक अधिक सेंसेटिव्ह झाले आहेत. आधी लोक खूप हुशार होते. शिक्षित असणं आणि हुशार असणं यात खूप फरक आहे. शिक्षणामुळे आज लोक गोष्टींना चुकीच्या पद्धतीनं घेत आहेत. एक गाणं होतं 'मुझको राणा जी माफ करना' या गाण्याचा अर्थ आहे की माझ्या नवऱ्याच्या मेहूण्यासोबत झोपले, तर मला माफ करा, तर हे आक्षेपार्हय नाही का?"


हेही वाचा : Atiq Ahmed Shot Dead : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं Yogi Adityanath यांच्याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत


पुढे शिक्षण आणि इंटेलेक्चुअल गोष्टीविषयी बोलताना हनी सिंग म्हणाला, "आधी लोक हुशार होते. आज आपण हुशार असणं त्याला बोलतो, ज्याचं खूप शिक्षण झालं आहे. जसं कोणी एमफिलचं शिक्षण घेतलं आहे. लोक म्हणतात की हा खूप हुशार आहे. पहिले लोकांचे विचार मोठे होते. मनोरंजनला मनोरंजन म्हणून घेत नाहीत. आज असं आहे की जर कोणत्या अभिनेत्रीनं बिकिनी परिधान केली तर लोक तिच्या मागे लागतात. काहीही बोलतात. का म्हणून ती बिकिनी परिधान करू शकत नाही?" याशिवाय या मुलाखतीत हनी सिंग त्याच्या मानसिक आजाराविषयी देखील मोकळेपणानं बोलला आहे.