दुबई :आशिया कपमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) देखील या सामन्यात उपस्थित होता. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाच्या त्या एका खेळाडूची एकचं चर्चा रंगली होती आणि हा खेळाडू म्हणजे रिषभ पंत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण खरी गम्मत पुढे आहे  मागे एकदा उर्वशी रौतेलाने एक स्टेटमेंट केलं होत ज्यात ती म्हणाली होती कि ती  क्रिकेट पाहत नाही.  ती 'क्रिकेट पाहत नाही' म्हटल्यानंतर आणि भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतवर तिचा अप्रत्यक्ष उपहास केल्यानंतर, अभिनेत्री उर्वशी रौतेला दुबईतील आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात सहभागी झाली. 


यामुळे आता उर्वशी रौतेला  सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली आहे. कारण क्रिकेट पाहत नाही असं स्टेटमेंट केल्यानंतर उर्वशी मॅडम कालच्या मॅचमध्ये दिसून आल्या,बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) टीम इडियाला चीअर करताना दिसली. अनेकदा स्क्रिनवर तिला भारताचा झेंडा फडकवताना दाखवण्यात आले. या संबंधित तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिच्या फोटोचा संधर्भ घेत एका युझरने म्हटलं ''हिला तर क्रिकेट आवडत नाही ना? '' त्यावर दुसऱ्या युझरने रिषभ पंत ला टोमणा मारण्यासाठी लिहिलं '' अच्छा म्हणून रिषभ पंत खेळत नाहीये.'' त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने व उर्वशी रौतेलाच्या  (Urvashi Rautela) उपस्थितीमुळे ऋषभ पंतची चर्चा सुरु झाली होती.