Shreya Dhanwanthary Bikini Look: बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रिटींच आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन मालदीव आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी मालदीव बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता 'भाभी जी घर पर हैं' मधील 'अंगूरी भाभी' अर्थात शुभांगी अत्रेनंतर 'द फॅमिली मॅन' आणि 'स्कॅम 1992' सारख्या कार्यक्रमात अप्रतिम अभिनय करणारी अभिनेत्री  मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत आहे. इन्स्टाग्रामवर बिकिनीमधील फोटो शेअर केल्याने नेटकरी घायाल झाले आहेत. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे आणि दररोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटो पोस्ट करत आहे. अलीकडेच, श्रेयाने काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात तिने बिकिनी परिधान केल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रेया इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे बीचचे लूक चाहत्यांसोबत शेअर करत आहे.



नुकतेच श्रेया धन्वंतरीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देत आहे. श्रेयाच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही आणि ती नॅचरल लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. तर बॅकग्राउंडला मालदीवचा खोल निळा समुद्र दिसत असल्याने फोटो खूपच छान दिसत आहे. श्रेयाने एकत्र तीन फोटो पोस्ट केले आहेत. यावर एका युजर्सने लिहिलं आहे की, ही मुलगी आग लावत आहे. आठवडाभरापासून तू मला भुरळ घालत आहे, असं का करते?, असं दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव सुरु आहे.