मुंबई : सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे खासगी फोटो आणि व्हिडीओ कायम लीक होत असतात. ज्यामुळे सेलिब्रिटींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलीनने खासगी आयुष्याचा सन्मान करण्याचं आवाहन केलं. फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती महाठग सुकेश चंद्रशेखर आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण फोटो आणि व्हिडिओ लीक होतात तरी कसे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. काही सॉफ्टवेयर आहेत ज्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या खसगी गोष्टी समोरच्याला लीक करणं सहज शक्य होतं. 


फोटो आणि व्हिडिओ लीक होण्यामागे Password Guessing हे देखील एक कारण आहे. काही हॅकर्स Password Guessingच्या माध्यमातून एखाद्याचे खासगी फोटो आणि व्हिडीओ लीक करतात. त्यानंतर त्या गोष्टींचा उपयोग वाईट कामांसाठी करतात. 


Password Guessing द्वारे फोटो आणि डेटा देखील लीक होऊ शकतो.  अशा परिस्थितीत, नेहमी एक मजबूत पासवर्ड तयार करण्याचा सल्ला दिला जातो.


Social Engineering हा डेटा हॅक करण्याचा देखील एक मार्ग आहे. याद्वारे हॅकर्स काही मोठ्या गोष्टी हॅक करतात. Social Engineeringचा उपयोग फक्त सिस्टम नाही तर संपूर्ण फोन हॅक करण्यासाठी देखील होतो.