मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम भारतीय मालिकांच्या इतिहासातील एक सोनेरी पण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. केबीसीच्या पहिल्या पर्वापासूनच हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. आता त्याचे नववे पर्व चालू चालू आहे. या सर्व प्रवासात कर्यक्रमाची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. अनेकांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर विशेष भूमिका निभावतो. पण हा कॉम्प्युटर जी नेमका आहे तरी कसा? चला जाणून घेऊया... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ‘कॉम्प्युटर जी’ बद्दल अनेकांना कुतुहूल आहे. त्या कॉम्प्युटरची स्क्रीन नेमकी कशी दिसते? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. तर केबीसीच्या पर्वात भाग घेतलेल्या आणि १२ लाख जिंकलेल्या अभिनव पांडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्टचे स्पर्धक असताना ते थेट बच्चन यांच्या मागे बसले असल्याने त्यांच्या स्क्रीनवर नेमकं काय दिसत याची माहिती त्यांना आहे, असे त्यांनी सांगितले. 


अमिताभ बच्चन यांच्या कॉम्प्युटरवर प्रश्न, पर्याय, स्पर्धकांकडे कोणत्या लाईफ लाईन्स शिल्लक आहेत, याची माहिती असते. त्याचप्रमाणे हॉट सीटवर आलेल्या स्पर्धकाची वैयक्तिक माहिती, आवड निवड, शहर यासारखी छोटी मोठी माहितीही दिलेली असते. विशेष म्हणजे जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो, त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर अमिताभ बच्चन यांनाही ठाऊक नसतं. स्पर्धकांनी आपलं उत्तर निवडून त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतरच त्याचं योग्य उत्तर बच्चन यांच्या स्क्रीनवर दाखवलं जातं, असं अभिनव पांडे यांनी सांगितले.