`बहरला हा मधूमास` गाणं कसं झालं हिट? अभिनेत्री सना केदार शिंदेचा मोठा खुलासा
सध्या संपूर्ण जगाला `बहरला हा मधूमास नवा` या गाण्याने वेड लावलं आहे. नुकताच सर्वत्र `महाराष्ट्र शाहिर` हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : सध्या संपूर्ण जगाला 'बहरला हा मधूमास नवा' या गाण्याने वेड लावलं आहे. नुकताच सर्वत्र 'महाराष्ट्र शाहिर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला रसिंकाचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या सिनेमात अंकूश चौशरी आणि सना शिंदे मुख्य भूमिकेत आहे. सोशल मीडियावर सध्या एका गाण्याची जोरदार चर्चा आहे ते गाणं म्हणजे 'बहरला हा मधूमास नवा' या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. प्रत्येकजण या गाण्याची हूकस्टेप फॉलो करत व्हिडिओ शेअर करत आहे. देशातच नव्हेतर बाहेरच्या देशातही या गाण्याची क्रेझ आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला हे गाणं कसं हिट झालं याबद्दल सांगणार आहोत.
झी २४तासला दिलेल्या मुलाखतीत हे गाणं कसं हिट झालं यावंर सना शिंदेला प्रश्न विचारण्यात आला यावंर बोलताना सना केदार शिंदे म्हणाली, ''आम्ही ते गाणं जेव्हा शूट करत होतो. तेव्हा बाबांचं असं होतं की, एक हुक स्टेप पाहिजे. कृती महेश ही जी आमची कोरिओग्राफर आहे त्या गाण्याची तिला सांगितलं की, कॅची हुकस्टेप जी असेल ती पाहिजे. जी सोप्पीही असेल. त्यावेळेला काहीही विचार केलेला नव्हता की, व्हायरल होईल वैगेर. फक्त तो गोडवा दिसायला पाहिजे.
बहरला हा मधूमास गाण्यातला. आणि हे गाणं शूट झालं. तेव्हा बाबांनी भरत काकांनी अंकूश काकाने ते रिल शूट केलं मी देखील रिल करुन ठेवलंलं. आणि विचार केलेला हे रिल आपण स्वत:साठी टाकूया. ते लोकांनी डोक्यावर घेतलं आणि लोकांनी स्वत:हून ते गाणं उचलून धरलं हिच खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी कधी ते व्हायरल झालं ते कळंलच नाही आम्हालापण. आणि आता त्या गाण्यावर सगळेच म्हणजे लहानांपासून वयस्कर बायका, परुष प्रत्येक गटात तसंच इंडियाच नव्हेतर बाहेरच्या देशातही ईतके रिल्स आता मला येतायेत. मॅसेज येतायेत. की, गाणं सुंदर आहे. हुप स्टेप सुंदर आहे. तर छान वाटतं असं बघून. की, डेब्यू सिनेमाला इतका छान प्रतिसाद मिळतोय हे पाहून.''
यावंर अंकूश पुढे म्हणाला की, ''लोकं आता यांवर डान्सच नव्हेतर लोक त्याच्यावर कॉमेडी सिक्वेन्स काय काय करतात. त्या शब्दांचा काय-काय खेळ करतायेत. ही कधी मी किंवा केदारनेसुद्धा कधी विचार केला नव्हता'' पुढेच या प्रश्नाला लागून सना म्हणाली की, यासाठी अजय-अतूल आणि गुरु ठाकुर अशा तिघांना थँक्यू आणि कृतीला सुद्धा की, ते सगळं घडून आलंय एवढं छान.'' नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांचा या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे.