लग्नासाठी रणवीर - दीपिका एका दिवसांत करणार इतका खर्च
तुम्हाला ही वाचून बसेल धक्का
मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची तयारी इटलीतील लेक कोमोमध्ये सुरू झाली आहे. अनुष्का - विराटच्या लग्नानंतर बी टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेलं हे लग्न आहे. आपल्या खास दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी दीपिका - रणवीरने कोणतीच कसर सोडलेली नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का की, लेक कोमोमध्ये लग्न करण्यासाठी दीप-वीरने किती खर्च केला आहे.
दीपिका - रणवीरच्या लग्नातील सर्व विधी या इटलीतील लेक कोमोच्या विला देल बालबीएनलो केल्या जाणार आहेत. दोन दिवस चालणारं हे लग्न कोंकणी आणि सिंधी पद्धतीने केलं जाणार आहे. बॉलिवूड लाइफनुसार या विलाचं एका दिवसाचं भाडं हे जवळपास आठ ते दहा हजार यूरो असणार आहे.
भारतीय चलनानुसार या विलाचं भाडं हे 8,20,000 रुपये असणार आहे. या विलामध्ये फक्त 80 नातेवाईक असणार आहेत. विलाच्या एका खुर्चीचा खर्च जवळपास 10 यूरो म्हणजे 819 रुपये असणार आहेत. जर लग्नाचा कार्यक्रम 3 तासापेक्षा अधिक चालणार असेल तर हाऊसकीपर सर्व्हिस घ्यावी लागणार आहे. या सर्व्हिसची किंमत जवळपास 300 यूरो म्हणजे 25 हजार असणार आहे.
तसेच पिंकविलाच्या रिपोर्टनुसार रणीर सिंहने सीप्लेनमध्ये जवळपास 14 लोकांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे. रणवीरसोबत त्याचे कुटुंबीय देखील या सीप्लेनमधून येणार आहे. या 14 जणांव्यतिरिक्त इतर मंडळी ही लक्झरी यॉटमधून येणार आहेत. याकरता दोन यॉटची बुकिंग केली आहे.