ए.पी.ढिल्लन हा भारतातील एक नावाजलेला पंजाबी गायक आहे.मात्र सध्या गायन कौशल्यासाठी नाही तर त्याच्या घरावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासाठी चर्चेत आला आहे.पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावरसूद्धा असाच हल्ला झाला होता.ए.पी.ढिल्लन त्याच्या अनोख्या गायन शैलीसाठी जरभरात प्रसिद्ध आहे . त्याचे अनेक चाहते आहेत.कोचेला आणि लोल्लापलूजा सारख्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये ए.पी.ढिल्लनचा देखील कार्यभाग असतो .पंजाबी श्रोत्यांना तर तो फारच आवडतो, त्याची पंजाबी संगीत क्षेत्रात वेगळी जागा त्याने निर्माण केली आहे.
सध्या ए.पी.ढिल्लनला मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याचे चाहते चिंतीत आहेत. या घटनेनंतर सर्वांना सिद्धू मुसेवालावर झालेला हल्ला ज्यात त्याचा मृत्यू झाला ती घटना आठवायला लागली. या प्रकरणांमुळे संगीतसृष्टीतील कलाकारांच्या सूरक्षिततेवर प्रश्न उठवले जातायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे प्रेयसी?
जगप्रसिध्द अमृतपाल सिंग ढिल्लोन( ए.पी.ढिल्लोन) हा एक इंडो-कॅनेडियन रैपर आहे. तो अविवाहीत असून बनिता संधू ही ब्रिटिश अभिनेत्री त्याची प्रेयसीआहे. ए.पी.ढिल्लन आणि बनिता संधू यांच्या नात्याबद्दलची चर्चा 2023ला आलेल्या 'विद यू' या गाण्यात बनिता दिसल्यानंतर सुरु झाली नंतर बनितानेच इंस्टाग्रामवर त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता.


किती कमवतो ए.पी.ढिल्लन?
2024पर्यंत ए.पी.ढिल्लनकडे अंदाजे 10 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांनूसार 83 कोटी एवढी संपत्ती आहे. ए.पी.ढिल्लन प्रत्येक गाण्याचे 12033 अमेरिकन डॉलर (भारतीय 10लाख रुपये) एवढे पैसे घेतो. त्याची महिन्याची कमाई 48,132 डॉलर(40लाख) आहे . गाण्यांची विक्री आणि स्ट्रीमिंगमधून तो भरपूर कमवतो.यूट्यूब ,स्पॉटीफाय आणि अॅपल म्यूझीक आदींवर ढिल्लन खुप कमावतो.