मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटासाठी सचिन तेंडुलकरला किती पैसे मिळाले याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी सचिनला तब्बल ४० कोटी रुपये मिळाले आहेत. हा चित्रपट भारतात २४०० स्क्रीनवर तर परदेशात ४०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बायोपिकमध्ये सचिनच्या बालपणापासून ते वानखेडे स्टेडियमवर त्यानं खेळलेल्या शेवटच्या सामन्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये कोणताही अभिनेता मुख्य भूमिकेत नसून ही एक डॉक्यूमेंट्री आहे. याआधी धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांतसिंग राजपूत आणि अजहरच्या बायोपिकमध्ये इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत होता.