देशाची पत्नी आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी नीता अंबानी आज 60 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1964 रोजी मुंबईत झाला. आज नीता अंबानी रिलायन्स अंतर्गत अनेक प्रकारचे व्यवसाय हाताळत आहेत. इतकेच नाही तर त्या अनेक व्यवसायांची मालकीण आहे. नीता आणि मुकेश अंबानी यांचा विवाह 8 मार्च 1985 रोजी झाला होता. मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना अनोख्या पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीता अंबानी यांची निवड सर्वात अगोदर मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी केल्याचं म्हटलं जातं. नीता अंबानी या भरतनाट्यममध्ये पारंगत असल्याच सगळ्यांनाच माहित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एके दिवशी धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानींनी नीता यांना भरतनाट्यम करताना पाहिले. नीता अंबानी यांच्या नृत्याने ते खूपच प्रभावित झाले होते. नीता आणि त्यांचा मोठा मुलगा मुकेश यांची जोडी एकदम परफेक्ट असेल असं दोघांना वाटत होतं.


गाडीत केलं प्रपोझ 


लग्नापूर्वी नीता अंबानी यांचे पूर्ण नाव नीता दलाल होते. त्यांच्या वडिलांचे नाव रवींद्रभाई दलाल होते. ते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. लग्नापूर्वी नीता अंबानी शिक्षिका म्हणून कार्यरत  होत्या. शास्त्रीय नृत्यांगनाही राहिल्या. नीता दलाल यांना पसंती दिल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी नीता अंबानी यांच्या पालकांशी चर्चा केली.


नाते जवळपास निश्चित झाले होते. लग्नाच्या एक दिवस आधी मुकेश अंबानी नीता अंबानी यांना कारमध्ये घेऊन जात होते. मुंबईतील कफ परेड रोडवर त्यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. मुकेश अंबानींनी गर्दीत सिग्नलवर गाडी ट्रॅफिकमध्ये थांबवली. मग ते नीता अंबानींकडे वळले आणि विचारलं, 'माझ्याशी लग्न करशील का?'


नीता अंबानी आश्चर्यचकित झाल्या


गजबजलेल्या ट्रॅफिकमध्ये मुकेश अंबानी त्यांना कारमध्ये असे प्रपोज करतील याची कल्पनाही नीता अंबानींनी केली नसेल. मुकेश अंबानींचा ही प्रपोजची पद्धत पाहून ती थक्क झाली. सुरुवातीला दोघांनाही थोडा संकोच वाटला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी म्हणाले होते की, जोपर्यंत ती (नीता अंबानी) उत्तर देत नाही तोपर्यंत मी गाडी हलवणार नाही. हे ऐकून नीता अंबानी यांनी मुकेश अंबानींचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर दोघांनी लग्न केले.


कोटींची संपत्ती सांभाळतात


आज कुटुंबासोबत नीता अंबानीही अनेक व्यवसाय सांभाळतात. ती शिक्षण, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक संस्था पाहते. नीता या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत. 2010 मध्ये त्यांनी त्याची स्थापना केली. या अंतर्गत त्या अनेक प्रकारचे कार्य करतात. 


याशिवाय नीता अंबानी आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या सह-मालक आहेत. महिलांसाठी काम करणाऱ्या 'Her Circle' या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांनी जिओ वर्ल्ड सेंटर सुरू केले. याशिवाय त्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक आणि चेअरपर्सन देखील आहेत. याशिवाय इतर अनेक संस्थांच्या त्या संस्थापक आहेत.