DDLJ Shah Rukh Khan and Kajol's Bra Scene : 90 च्या दशकातील मुलांचा जो काळ होता तो कोणी विसरू शकत नाही. या काळातील जे चित्रपट होते ते चित्रपट आजही आपल्या मनात घर करून बसले आहेत. ते चित्रपट आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजच्या पिढीला देखील ते चित्रपट पाहताना कंटाळ येत नाही. पण त्यावेळी असे अनेक चित्रपट होते त्यात अनेक काही गोष्टी होत्या, ज्यात चुका होत्या पण कोणाला कळलंच नाही. त्या आज ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा युट्यूब असल्यानं लोक हे चित्रपट कधीही आणि कुठेही पाहू शकतात. त्यामुळे लोकांना त्यातील काही चुका आहेत ज्या लक्षात येतात. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे'. त्यातलाच एक सीन आता चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील एक सीन हा एका नेटकऱ्याच्या लक्षात आला ज्याकडे आजवर कोणी लक्ष दिलं नव्हतं आणि तो सीन म्हणजे शाहरुख जेव्हा काजलला तिची ब्रा दाखवतो. हा सीन तुमच्या लक्षात नसेल तर एक सीन आहे ज्यात ट्रेनमध्ये सिमरन ही तिची बॅग भरण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे शाहरुख सतत तिला चिडवण्यासाठी मस्ती करताना दिसतो. काजोल तिची पूर्ण बॅग भरते त्यातील एकही कपडा खाली नसतो. त्यात ब्रा कुठेच नसते. पण अचानक शाहरुख बसतो आणि जादुनं तो ब्रावर बसला आहे असे त्याच्या लक्षात येते आणि ती ब्रा तो काजोलला देतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


पाहा व्हायरल व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कशी दिली प्रतिक्रिया 


या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की 'त्यावेळी विचार केला नव्हता की ओटीटी प्लॅटफॉर्म येतील तर लोक पॉज करून पाहतील.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लॉजिक समोर आहे... हा ती ब्रा त्याच्या पॉकेटमध्ये घेऊन फिरत होता.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'खिश्यातनं काढली... घरूनच घेऊन आला होता.' तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याची स्तुती केली आहे. कारण आजवर कोणाच्याच ही गोष्ट लक्षात आली नव्हती आणि त्यानं हा फरक स्पॉट केला. तर काही नेटकऱ्यांनी ब्रा का स्क्रिनवर दाखवली नाही याविषयी सांगत म्हटले की 'तो एक सीन आहे आणि जर आधीच ब्रा दाखवली तर पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांना आधीच कळेल.' दरम्यान, या चित्रपटात शाहरुखनं राजची भूमिका साकारली होती. तर काजोलनं सिमरनची.