उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, पाठकबाईंचा सल्ला
तुझ्यात जीव रंगला या मालिकेद्वारे पाठकबाई अर्थात अक्षया देवधर घरांघरात पोहोचली.
मुंबई : तुझ्यात जीव रंगला या मालिकेद्वारे पाठकबाई अर्थात अक्षया देवधर घरांघरात पोहोचली. या मालिकेतील अक्षया देवधरने सोज्वळ पाठकबाईंची भूमिका स्वीकारलीये. ही भूमिका निभावताना साहजिकच अक्षयाला मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे शूटिंगही बऱ्याचदा बाहेरच्या लोकेशनवर असते. त्यामुळे उन्हाचा त्रास त्यांनाही सहन करावा लागतो. या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना अनेकाविध उपाय करावे लागतात. उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी अक्षया देवधर अर्थात तुमच्या आमच्या पाठकबाईंनी खास सल्ला दिलाय.
अक्षया देवधरच्या खास टिप्स
१. उन्हाळ्याच्या दिवसांत घरगुती सरबतानां अधिक महत्त्व द्या. थंड पेय प्या. तिखट पदार्थ खाणे टाळा.
२. भरपूर पाणी प्या. बाहेर जात असाल तर डोक्याला रुमाल बांधा. भरपूर ताक प्या. तिखट खाणे टाळा. सनस्क्रीनचा वापर जरुर करा.
३. स्कार्फचा वापर करा. केसांची काळजी घ्या. तेलाने केसांना मसाज करा. नियमितपणे तेलाने केसांना मसाज करा. ग्लुकोन्डी, इलेक्ट्रॉल पावडर जरुर स्वत:कडे बाळगा.