Farhan Akhtar on Javed Akhtar's Second Marriage : ही गोष्ट आहे, 1970 च्या दशकातील जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्रीमुळे चालत होते. तिथे पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) या जोडीने हा दृष्टीकोन बदला. या जोडीने चित्रपट कथा आणि त्यातील डॉयलॉगमुळे चालते हे त्यांनी सिद्ध केले. सलीम खान यांनी हेलनसोबत दुसरं लग्न केलं होतं. तर जावेद अख्तर यांनीही शबाना आझमीसोबत दुसरं लग्न केलं. या दोन्ही प्रसिद्ध जोडीबद्दल ॲमेझॉन प्राइमच्या डॉक्युमेण्ट सीरिज, अँग्री यंग मेनमध्ये संघर्ष, करिअर, दोघांची मैत्री आणि विवाहिक जीवनाबद्दल सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्याशी लग्न केल्यावर हनी इराणी, फरहान आणि झोयाची काय अवस्था होती. वडील जावेद यांनी दुसरं लग्न केलं हे कळल्यावर फरहान अख्तरने या सीरिजमध्ये सांगितलंय. फरहानने त्या कठीण काळाबद्दल बोलताना अनेक खुलासेही केलंत. अभिनेत्याने सांगितलं की या प्रकरणावर तो खूप संतापला होता, त्याला वाटलं की कोणीतरी आपली फसवणूक केलीय. अभिनेत्याचे हे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


अँग्री यंग मेनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, फरहान अख्तरने खुलासा केलाय की जेव्हा जावेद अख्तरने त्याच्या आईपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला राग आला होता. त्याला असं वाटत होतं की त्याच्या वडिलांनी विश्वासघात केला आहे. आपल्या कठीण प्रसंगांची आठवण करून देताना अभिनेता म्हणाला, 'एक काळ असा होता जेव्हा मी त्याच्यावर रागवला होतो. त्यांनी माझा विश्वासघात केला आहे असं त्याला वाटायचं. त्या वेळी मला मुलाच्या सर्व भावना होत्या.


याबद्दल बोलताना झोया अख्तर म्हणाली की, तिच्या वडिलांचं नवीन लग्न स्वीकारायला खूप वेळ लागला. कुटुंबात गोंधळ उडाला आणि बाहेरचे लोकही विविध आरोप करते होते. पण झोयाने सांगितलं की शबाना आझमी यांनी यावेळी बऱ्याच सकारात्मक गोष्टी केल्या ज्यामुळे प्रत्येकासाठी हे सोपे झालं. झोया म्हणाली, 'आमच्या विभक्त झाल्यानंतर आम्ही आमची आई हनी इराणीसोबत राहत होतो. त्यामुळे आम्ही आमच्या आईसोबत जास्त वेळ घालवला. पण, हो...माझ्या वडिलांसोबत गोष्टी पूर्वपदावर हळूहळू होत होत्या.