Hrithik Roshan as Greek god: ऋतिक रोशन हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. तो त्याच्या अभिनयाबरोबरच तो डान्समुळे देखील प्रेक्षकांना खूप आवडतो. पण एक काळ असा होता जेव्हा डॉक्टरांनी त्याला डान्स करण्यास मनाई केली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 'ऋतिक पुन्हा कधीही डान्स करू शकणार नाही'. मात्र, ऋतिकने डॉक्टरांचे हे वक्त्व्य खोटे ठरवले आणि स्वतःच्या जबरदस्त डान्सने सगळ्यांच्या मनावर राज्या केले.


ऋतिक रोशनला 'ग्रीक गॉड' का म्हणतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतिक रोशनला 'ग्रीक गॉड' म्हणतात, याचं कारण म्हणजे त्याचा अप्रतिम लूक, अभिनय कौशल्य आणि डान्सिंग टॅलेंट. ‘कहो ना प्यार है’पासून ते ‘फायटर’पर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या डान्सिंग मूव्हजमुळे तरुणाई आणि मुलं त्याच्यापासून प्रेरणा घेतात. पण एकेकाळी त्याची हेल्थ कंडिशन इतकी गंभीर होती की डॉक्टरांनी त्याला डान्स न करण्याचा सल्ला दिला होता.


डॉक्टरांनी का केली होती डान्सवर बंदी?


अलीकडेच एका मुलाखतीत ऋतिक रोशनने सांगितलं होतं की, त्याला लहानपणी 'स्कोलीओसिस' नावाचा आजार झाला होता. हा आजार मणक्याच्या हाडाशी संबंधित असून, यामध्ये मणक्याजवळील हाडे वाकडी होतात. डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तो कधीही डान्स करू शकणार नाहीत. पण, ऋतिकने त्यावर मात केली. त्याने जॉगिंग आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची परिस्थिती सुधारली. ऋतिक म्हणाला "डान्स तुमच्या शरीराला मजबूत बनवतो, फ्लेक्सिबल ठेवतो आणि मन आनंदी ठेवतो."


हे ही वाचा: VD 14: प्रभासनंतर 'या' साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करतील बिग बी; कोण आहे हा अभिनेता?


‘कहो ना प्यार है’पासून सुपरस्टार अशी ओळख


साल 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाद्वारे ऋतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'एक पल का जीना' या गाण्यातल्या त्याच्या डान्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आज ऋतिक हिप-हॉप, सालसा यांसारख्या विविध डान्स फॉर्म्समध्ये निपुण आहे. त्याने मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करून बॉलिवूडचा ‘डान्सिंग सुपरस्टार’ हा किताब मिळवला आहे.