मुंबई : बॉलिवूडचा 'हॅन्डसम हंक' ऋतिक रोशन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या निळ्या डोळ्यांमुळे 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणाऱ्या ऋतिकचा जन्म १० जानेवारी १९७४ मध्ये मुंबईत झाला होता. २००० साली 'कहो ना प्यार है' सिनेमातून त्यानं आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. याच वर्षी ऋतिकनं आपल्या दीर्घकाळापासून गर्लफ्रेंड असलेल्या सुझान खान हिच्याशी विवाह केला. 


मात्र, लग्नानंतर १४ वर्षांनी या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळं आली.. आणि २०१४ साली हे दोघे कायदेशीर पद्धतीन विभक्त झाले. पण, घटस्फोटानंतरही या सुझान-ऋतिकची मैत्री मात्र घट्ट आहे, हे तुम्हाला सुझानची इन्टाग्राम पोस्ट वाचून लक्षात येईलच... 



ऋतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुजाननं दोघांचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोतही दोघं खूपच सुंदर आणि आनंदी दिसतायत. 'तू नेहमी... नेहमीच माझ्या जीवनात प्रकाश राहशील... वाढदिवसाच्या शुभेच्छा'


सुझानच्या या पोस्टला अनेक लाईक्स आणि कमेंटस् मिळाल्यात. त्यांच्या फॅन्सलाही त्यांचा हा अंदाज चांगलाच आवडलाय. 


या जोडप्याला ऋहान आणि ऋदान नावाची दोन मुलं आहेत... मुलांसोबत सुझान आणि ऋतिक एकत्र अनेकदा व्हेकेशन, डिनर किंवा सिनेमा एन्जॉय करताना दिसतात.