Hrithik Roshan and Saba Azad Love Story : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. हृतिक हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळ चर्चेत आहे. हृतिक सध्या चर्चेत असण्याचं कारण त्याची गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad)आहे. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण सतत पाहतोय. नुकताच हृतिक आणि सबाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो हृतिकची बहिण सुनैना रोशनच्या (Sunaina Roshan) वाढदिवसाला पोहोचले होते (Sunaina Roshan Birthday).  दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबा आणि हृतिकच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना. एकीकडे त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना. खूप कमी लोक आहेत, ज्यांना हृतिक आणि सबाची लव्ह स्टोरी माहित आहे. खरंतर या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ट्विटरवरून झाली. रिपोट्सनुसार, सबा आणि हृतिक यांची मैत्री ही ट्विटरवरून झाली आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण मैत्री कशी झाली हा प्रश्न असेल तर... हृतिकनं सबाचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत सबा एका आंतरराष्ट्रीय रॅपरसोबत गाताना दिसली. सबाचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर केल्यानंतर हृतिकनं तिला मेसेज देखील केला होता. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 



20 फेब्रुवारी 2021 मध्ये हृतिक आणि सबाला एकत्र स्पॉट करण्यात आले. रेस्टॉरंट आणि कधी मग विमानतळावर त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले. सबा काल म्हणजेच 22 जानेवारी रोजी हृतिकची बहिण सुनैना रोशनच्या घरी तिच्या वाढदिवसानिमित्तानं पोहोचली होती. हृतिकची आई पिंकी रोशननं सुनैनाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी देखील रोशन कुटुंबासोबत सबा दिसली. 


हेही वाचा : 'ये है हिंदुस्तान की आवाज...', Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित


दरम्यान, 20 डिसेंबर 2000 रोजी हृतिकने सुझान खानसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत. लग्नाच्या 14 वर्षांनंतर म्हणजे 2013 साली हृतिक आणि सुझाननं विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. परस्पर सामंजस्यानं त्या दोघांनीही नात्याला पूर्णविराम दिला. तरी देखील ते दोघं मुलांसाठी एकत्र येत असल्याचे पाहायला मिळते. मुख्य म्हणजे या घटस्फोटानंतर हृतिकनं सुझॅनला 380 कोटी रुपये इतकी पोटगी दिली होती.