मुंबई : नेहा धूपियाच्या 'नो फिल्टर' शोमध्ये नेहमीच नवनवीत कलाकार येत असतात. या शोमध्ये आपल्या जीवनाशी आणि करिअरशी संबंधित नवनवीत गोष्टी शेअर करत असतात. यावेळी या शोमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये सौरव दा ला त्याच्या बायोपिकबद्दल विचारण्यात आलं. हृतिक रोशनने सौरव गांगुलीची भूमिका  बायोपिकमध्ये साकारावी असा सवाल विचारण्यात आला. यावेळी दादाने खूप मजेशीर अट घातली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 



सौरव गांगुलीला नेहा धूपियाने विचारलं की, तुमच्यावर बायोपिक तयार होत आहे. यामध्ये तुमची भूमिका कोण साकारू शकतं. यावर सौरवदाने हृतिकचं नाव घेतलं. त्यावर पुढे सौरव गांगुलीने म्हटलं की,'त्याला सगळ्यात अगोदर माझ्यासारखी बॉडी करावी लागेल. हृतिकची बॉडी चांगली असल्यामुळे त्याचं कौतुक होईल. पण त्याला अगोदर माझ्यासारखी बॉडी करावी लागेल.'


ज्यावेळी 'सुपर ३०' चित्रपटात हृतिकला आनंद कुमार यांच्या भूमिकेसाठी निवडलं त्यावेळी अनेकांनी त्यावर शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र हृतिकनं ती भूमिका लीलया पेलली. हृतिक हा एकमेव असा अभिनेता होता, जो आनंद कुमार यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकत होता. अनेकांना हृतिकसारखी शरीरयष्टी पाहिजे असते.