Hrithik Roshan at Sussanne Khan's Birthday Party With Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खानचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत हृतिक त्याची गर्लफ्रेंड सबा आजादसोबत पोहोचला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सबानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्याशिवाय तिनं सुझैनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यात आधी सबानं सुझैनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय तिनं सुझैन खानचं टोपन नाव म्हणजेच तिचं पेट नेम काय आहे याचा खुलासा केला आहे. सुझैनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सबानं या पार्टितील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुझैन तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोनी आणि त्यांच्यासोबत सबा आणि हृतिक रोशन आहे. सुझैननं तिच्या वाढदिवासाच्या पार्टीत काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबत सोनेरी नेकपीस घातला आहे. अर्सलननं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. तर सबानं शिमरी ड्रेस परिधान केला आहे आणि हृतिकनं प्रिन्टेड शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत सबानं कॅप्शन दिलं की वाढदिवसाच्या शुभेच्छा Soozaloo नेहमीच अशी हसत आणि आनंदी रहा. दरम्यान, हे चौघं पहिल्यांदाच एकत्र दिसले असं नाही. या आधी देखील ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. 



हेही वाचा : एका चित्रपटासाठी 50 कोटी मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचं मनोरंजनसृष्टीत अर्धशतक; एकेकाळी अमिताभ यांच्यापेक्षाही...


दरम्यान, या पार्टीत बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जायद खान, फरदीन खान, फरहान खान अली, भावना पांडे, महीप कपूर, आदित्य सील आणि अनेक सेलिब्रिटी होते. हृतिक आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी पहिल्यांदाच एकत्र दिसले असं नाही. तर याआधी देखील अनेकदा ते दिसले आहेत. ते दोघं नेहमीच एकमेकांच्या रिलेशनशिपला पाठिंबा देताना दिसतात. इतकंच नाही तर ते सोशल मीडियावर कमेंट देखील करतात. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशननं सबा आणि त्याच्या रिलेशनशिपच्या वाढदिवसानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत त्यानं सबाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच पोस्टवर कमेंट करत सुझैननं कमेंट केली की सगळ्यात सुंदर फोटो आणि अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा.