हृतिकच्या गर्लफ्रेंडनं असं काय केलं? की संपुर्ण रोशन कुटुंब आलं चर्चेत
तिने किसिंग फेस इमोजी पोस्ट केला.
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आला आहे. चर्चा आहे की, हृतिक रोशन अभिनेत्री-गायिका सबा आझादला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना स्पॉट झाले आहेत.
दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगलं आहे. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडते आणि ते तिची खास काळजी घेतात..
नुकतीच सबा आजारी पडली तेव्हा हृतिकच्या कुटुंबीयांनी तिची विशेष काळजी घेतली. आता सबाने एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या नवीन फोटोवर हृतिकची चुलत बहीण पश्मीनाला फिदा झाली आहे. सबाच्या फोटोवर तिने कमेंट केली आहे.
सबा 'रॉकेट बॉईज' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तिने वेब सीरिजमधील एका लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पीच कलरची साडी नेसली आहे.
ती या लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. फोटो शेअर करताना सबाने लिहिले - मिस. परवाना इराणी. सिरसा 1942. हृतिकची चुलत बहीण पश्मीनाने सबाच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
राजेश रोशन यांची मुलगी पश्मीना रोशनने सबाच्या फोटोवर उफ्फ आणि हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. पश्मीनाच्या कमेंटनंतर सबाही मागे हटली नाही. तिने किसिंग फेस इमोजी पोस्ट केला. हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनच्या मुलीनेही सबाच्या फोटोवर कमेंट केली आहे.
एकूणच काय तर हृतिकच्या संपुर्ण कुटुंबाचं सबासोबत चांगलं बॉण्डिंग आहे.