Hrithik Roshan Fighter : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेत हा चित्रपट बनवण्यात आला. अशात असे म्हटले जात आहे की या चित्रपटातून पाकिस्तानी विरोधी भावना वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कारणामुळे काही देशांमध्ये हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे. चित्रपट हा एन्टी पाकिस्तान एलिमेंट्समधून जिथे निर्मात्यांना आशा होती की पाकिस्तानच्या या मुद्द्यावरून ते भारतीय प्रेक्षकांना गोळा करू शकतील. मात्र, त्यांना या सगळ्यामुळे नुकसाना सोसावं लागतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

M9News नावाच्या वेबसाइटवर प्रदर्शित झालेल्या माहितीप्रमाणे UAE आणि आखाती देशांमध्ये 'फायटर' प्रदर्शित होऊ शकला नाही त्यामुळे त्यांना 60 ते 80 कोटींचं नुकसान झालं आहे. त्याचं कारण म्हणजे तिथे देखील भारतीय चित्रपट पाहणाऱ्या लोकांची संख्या ही फार जास्त आहे. रिपोर्टनुसार, 'पठाण' आणि 'जवान'नं तिथे जवळपास 120 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं. 'फायटर' तिथे प्रदर्शित झाला नाही म्हणून कोटींचं नुकसान झालं आहे. आता निर्मात्यांचा हाच प्रयत्न असेल की हे सगळे पैसे ते भारतीय मार्केटमधून मिळवतील. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'फायटर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर लगेच जोर घेतला नाही. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी फक्त 25 कोटींचं कलेक्शन केलं होतं. त्यानंतर चित्रपटानं फक्त 22 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर रीपब्लिक डे कडून अपेक्षा ठेवली आहे की या विकेंडमध्ये कमाईत वाढ होईल. असं झालं देखील ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शप्रमाणे, 'फायटर' या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 41.2 कोटींची कमाई केली. बाकी आकाऊ बूकिंगविषयी बोलायचे झाले तर आज म्हणजेच रविवारी देखील चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा : सुंदर दिसण्यासाठी IV ड्रिप लावते जान्हवी कपूर?


सिद्धार्थ आनंदच्या आधी प्रदर्शित झालेल्या 'पठाण' आणि ‘वॉर’ सारख्या चित्रपटांप्रमाणे या चित्रपटानं छप्पर फाड कमाई अजून केली नाही. मात्र, अपेक्षा आहे की या चित्रपटात ज्या प्रमाणे सिद्धार्थ आनंदनं एक्सपेरिमेंट केलं आहे. त्यात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉयनं ऑफिसर्सच्या भूमिका साकारल्या आहेत. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यावर हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत ऋषभ साहनी दिसतोय. थोडक्यात त्याची आतंकवादी भूमिका आहे. ‘फाइटर’ नं त्याला टिपिकल विलनसारखा दिसला. फक्त तो प्रत्येक दोन शब्दात ‘हिंदुस्तान को सबक सिखाएंगे, कश्मीर हमारा है’ असं बोलताना दिसतो. त्यावरून अनेकांनी त्यांना सुनावलं आहे.