मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खान काही वर्षांपूर्वी विभक्त झाले. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे. घटस्फोट झाल्यानंतर देखील दोघे मुलांची योग्य काळजी घेताना दिसतात. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता हृतिकचं नाव अभिनेत्री  सबा आझादसोबत जोडलं जात आहे. पण हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाजने नुकताचं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'सेल्फी नाही, माझी कॉफी देखील नाही...' असं लिहिलं आहे. 


सबाच्या फोटोचं खास वैशिष्ट्य म्हणजे, तिचा हा फोटो बॉयफ्रेंड आणि अभिनेता हृतिक रोशनने क्लिक केला आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोची चर्चा आहे. सबाच्या फोटोवर अनेकांच्या कमेंट येत आहेत.



सबाची सोशल मीडिया पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी हृतिक आणि सबााला लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.  सध्या हृतिक आणि सबा पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. 


दरम्यान, हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हृतिक आणि सबा कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या छोटेखाणी लग्न सोहळ्याप्रमाणे हृतिक आणि सबा लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर हृतिक आणि सबाने काहीही सांगितलं नाही.