मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या गुड लूक्सशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आजकाल अभिनेता सबा खानसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. पण त्याआधी तो सुजैन खानसोबत विवाहबंधनात अडकला होता. पण हळूहळू दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला माहित आहे का की, सुझैनपासून घटस्फोट घेणं हृतिकला खूप महागात पडलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकने इतक्या कोटींची पोटगी दिली
हृतिक रोशन आणि सुजैन खान यांनी २००४ साली मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिकने सुझैनपासून वेगळं होण्यासाठी सुमारे 380 कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. त्यानंतर हा घटस्फोट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात महागडा घटस्फोट म्हणता येईल. मात्र, त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण कधीच उघड झाले नाही.


यामुळेच तुटलं हृतिक आणि सुझैनचं नातं!
बातम्यांनुसार, दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण म्हणजे अभिनेता अर्जुन रामपालसोबतची सुझैनची जवळीक. 'काइट्स' चित्रपटादरम्यान हृतिक आणि बार्बरा मोरी यांच्यात जवळीक वाढली होती, ज्यामुळे सुझानसोबतचे नाते तुटले होते.