सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला हृतिक रोशनच्या बॉडिगार्डची धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासामुळेही खूप चर्चेत असतो. सध्या हा अभिनेता सिंगर सबा आझादला डेट करत आहे. दोघांनीही चाहत्यांसमोर त्यांचं नात स्वीकारालं नसेलही पण त्यांच्या नात्याची झलक अनेकदा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अनेकदा त्यांना एकत्र मुंबईत वेळ घालवताना पाहिलं गेलंय. अनेकदा हे दोघंही ऐकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात.
आता पुन्हा एकदा बॉलिवूडचं हे स्टार कपल एकत्र दिसलं आहे. यादरम्यान हृतिक रोशनच्या एका चाहत्याला अभिनेत्याच्या बॉडिगार्डकडून वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ त्यांच्या लंच डेटचा आहे.
व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी हृतिक रोशनने कट स्लीव्ह हुडी आणि व्हाईट पँन्ट घातली होती. तर सबा आझादने निळ्या रंगाचा ट्यूब टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली होती. यादरम्यान हृतिक रोशनच्या एका चाहत्याला वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं.
जेव्हा हृतिक रोशन रेस्टॉरंटच्या बाहेर पडतो तेव्हा तो त्याच्या एक फॅन सेल्फी घेण्यासाठी अभिनेत्याजवळ येतो. त्याचा एक बॉडीगार्ड फॅनला सेल्फी घेण्यासाठी नकार देतो. आणि लगेच तिथे येऊन जोरात साईडला करतो. यानंतर हृतिक रोशन आणि सबा आजाद काम कारमध्ये जाऊन बसतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. युजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आपली प्रतिक्रीया देत आहेत.