आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत परफॉरमन्स करणार हृतिक
आयपीएल सीजन ११ काही दिवसातच सुरु होतं आहे. रणवीर सिंग आयपीएलच्या ओपनिंग सेरमनीमध्ये परफॉरमन्स करणार होता पण एका फुटबॉल मॅच दरम्यान जखमी झाल्याने हृतिक रोशन आता त्याच्या जागा परफॉरमन्स करणार आहे.
मुंबई : आयपीएल सीजन ११ काही दिवसातच सुरु होतं आहे. रणवीर सिंग आयपीएलच्या ओपनिंग सेरमनीमध्ये परफॉरमन्स करणार होता पण एका फुटबॉल मॅच दरम्यान जखमी झाल्याने हृतिक रोशन आता त्याच्या जागा परफॉरमन्स करणार आहे.
कोण-कोण करणार परफॉरमन्स
मॅनेजमेंटने हृतिकला संपर्क केला असता तो यासाठी तयार झाला. हृतिक सध्या त्याचीच तयारी करत आहे. कोरियोग्राफर शामक डावर यांच्या डांसिंग क्रू सोबत सध्या तो प्रॅक्टीस करत आहे. या आयपीएलच्या ओपनिंग सेरमनीमध्ये हृतिक शिवाय वरुण धवन, परिणीती चोपडा आणि जॅकलीन फर्नांडिस देखील परफॉरमन्स करणार आहे.
हृतिकचे २ नवे सिनेमे
हृतिक सध्या सुपर 30 सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमासाठी हृतिकने आपला लूक देखील बदलला आहे. सोबतच तो टायगर श्रॉफ सोबत एक अॅक्शन सिनेमा देखील करत आहे. हृतिकचा काबिल हा शेवटचा सिनेमा होता. जानेवारी २०१७ मध्ये तो रिलीज झाला होता.