हृतिकच्या पहिल्या डेटचा खर्च गर्लफ्रेंडने केला; नंतर वसूल केले तब्बल 400 कोटी रुपये
Hritik Roshan: सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुझेन खान हिची. तिचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आज तिचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का की तिनं हृतिक रोशन आणि तिच्या पहिल्या डेटचा खर्च उचलला होता.
Hritik Roshan: हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करतो आहे. त्याचसोबत त्याची पहिली पत्नी सुझॅन ही आता अर्स्लान सोनीला डेट करते आहे. त्यामुळे त्या दोघांची जोरात चर्चा रंगलेली आहे. 2014 साली त्या दोघांनी घटस्फोट घेतला होता. आज सुझॅन खानचा वाढदिवस आहे. त्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत सध्या ती चांगला वेळ स्पेंड करताना दिसते आहे. परंतु अनेकदा तिला ट्रोलही केले जाते. त्यामुळे तिचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. घटस्फोटाच्या वेळी हृतिक रोशननं सुझॅन खानला चक्क 400 कोटी रूपयांची पोटगी दिली होती. परंतु तुम्हाला माहितीये का की हृतिक रोशनच्या पहिल्या डेटचा खर्च चक्क सुझॅन खानचं उचलला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होती. तेव्हा नक्की काय किस्सा घडला होता हे आपण जाणून घेऊया.
सुझेन खान ही हृतिक रोशनची बालपणीची मैत्रीण होती. त्यांनी 2000 साली लग्न केले. त्यांच्या लग्नाचीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यांना रिधान आणि रेहान ही दोन मुलंदेखील आहेत. त्याचसोबत दोन्हीही मुलं ही हृतिकसोबत असतात. घटस्फोट झाला असला तरीसुद्धा आपल्या मुलांसाठी ते दोघं एकत्र भेटतात. मध्यंतरी हृतिक आणि त्याच्या दोन मुलांसोबत सबा आझादही दिसली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर 2014 साली मात्र त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा त्यांची मुलंही लहान होती. आपल्या लग्नापुर्वीही दोघं हे बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते.
त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरूवातही काहीशी रंजक होती. त्यांची भेट ही ट्रॅफिक सिग्नलवर झाली होती. जेव्हा सिग्नलवर लाल दिवा आला तेव्हाच त्यांच्या गाड्या या आजूबाजूला होत्या. तेव्हा त्यांनी आपल्या बाजूच्या गाडीत असलेल्या सुंदर मुलीकडे त्यांचे लक्ष गेले होते. ही मुलगी होती सुझॅन खान. यावेळी पहिल्या नजरेतच त्याचे सुझॅन खानवर प्रेम बसले होते. अशी काहीशी त्यांच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. त्यानंतर सुनैना रोशन यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात त्यांची परत भेट झाली होती.
पहिली डेट
पहिल्या डेटवर गेले असताना सुझॅन खाननं त्यांच्या पहिल्या डेटचे बिल भरले होते. कारण तेव्हा हृतिक रोशन आपलं वॉलेट विसरला होता. त्यानं तेव्हा तिला प्रपोज केले होते. तिच्या कॉफीत त्यानं तेव्हा रिंग घातली होती. तिला ते मिळताच मग त्यानं तिला प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते.