हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर होतेय ट्रोल, `हे` आहे कारण
सबा आझादसोबत असं काय झालं की ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली? हृतिक रोशनने मग...
मुंबई : सबा आझाद (saba azad) सोशल मीडियावर खुप चर्चेत असते. त्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत (hritik roshan) तिचं नाव जोडलं गेल्यापासून तिच्या इंटरनेटवरील चर्चा आणखीणच वाढल्या आहेत. मात्र याच इंटरनेटवर आता तिला ट्रोल केलं जातंय. नेमकं ती सोशल मीडियावर का ट्रोल होतेय, हे जाणून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (hritik roshan) आणि सुझान खान (sussanne khan) यांनी 2014 साली एकमेकांपासून घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर हृतिक रोशन याचे नाव गायिका सबा आझाद (saba azad) सोबत जोडण्यात आले. दोघे अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या पार्ट्यामध्ये अथवा फिरताना स्पॉट झाले होते. या फोटोनंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली होती.
आणखी वाचा : Fact Check : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय Sara Tendulkar?
सबा आझादची पोस्ट
दरम्यान आता हृतिक रोशनची (hritik roshan) गर्लफ्रेंड सबा आझादला (saba azad) सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या संदर्भात सबानेच इस्टाग्रामवर स्टोरी टाकून माहिती दिली आहे.विशेष म्हणजे तिने ही स्टोरी टाकून ट्रोलर्सचाच समाचार घेतला आहे.
ट्रोलर्स काय म्हणाले?
ज्या यूझरने सबा आझादला (saba azad) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपल्या कमेंटमध्ये लिहिले होते की, छी...ईईई...याकककक... तुम्ही असे दिसत असल्याचं म्हणत, तुम्हाला जे समजायचंय ते समजून घ्या, असे कमेंट केले होते. ही कमेंट करणारी युझर स्वतः एक मुलगी आहे. या यूझरने रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नातील सबा आझादच्या आउटफिटवर निशाणा साधला होता.
युझरचा घेतला समाचार
सबा आझादने (saba azad) या यूजरच्या पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर करत तिचा समाचार घेतला. 'यूजर्सना तिच्या लव्हशी प्रेम करतेय, पण तिचा द्वेष वाटून घेण्यासाठी ती माझ्या मागे लागली आहे. तिच्यासारखे अनेक लोक आहेत. पण तुम्ही लोक असे होऊ नका. यानंतर सबा आझादने युझर्सना असा सल्ला दिला की, त्यांना जेव्हा हवं असेल तेव्हा ते तिला अनफॉलो करू शकता.
तसेच आपल्यावर वाईट कमेंट करणाऱ्या फॉलोअर्सना ब्लॉक बटण माहीत नसून लवकरच कळेल, अशी खंतही तिने व्यक्त केली. खरं तर, सबा आझादवर अशी कमेंट करणाऱ्या युजरने तिच्या बायोमध्ये फन, फ्री, हॅप्पी, लकी आणि तिचं प्रेम असल्याचं लिहिलं आहे.