हृता दुर्गुळेचा `फुलपाखरू` नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला
हृताची नवी मालिका नवी लव्हस्टोरी
मुंबई : झी वाहिनी मालिका कायमच नवे कलाकार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अशीच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'फुलपाखरू' ही प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेने साऱ्यांचच मन जिंकलं. प्रेक्षकांनी हृताला खूप पसंत केलं. (Hruta Durgule upcoming Marathi New serial on Zee Marathi Man Udu Udu Jhala) आता पुन्हा एकदा अभिनेत्री हृता दुर्गुळे नव्या मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
30 ऑगस्टपासून झी मराठीवर 'मन उडु उडु झालं' ही मालिका सोमवार ते शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता भेटीला येणार आहे. या मालिकेत हृता दुर्गुळे दिसणार आहे. हृतासोबत या मालिकेत अजिंक्य राऊत भेटीला येणार आहे. हृताने वैदेही या भूमिकेतून प्रेक्षकांचं खूप मन जिंकल. तिचा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग आहे. असं असताना हृता आणि अजिंक्य राऊत ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'मन उडु उडु झालं' या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठीच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोवरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
हृता दुर्गुळे आपल्याला या आधी टीव्ही सिंगीग स्टारमध्ये सुत्रसंचलन करताना दिसली. 'झी युवा'वरील 'फुलपाखरू' या मालिकेत हृता दुर्गुळे अभिनेता यशोमन आपटेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. ही जोडी प्रेक्षकांनी फार उचलून धरली होती. आता हृता आणि अजिंक्यच्या जोडीबद्दल प्रेक्षकांना वाय वाटतं? पाहण्यासारखं असेल.
हृताने नुकतंच मनोरंजन क्षेत्रात आपली 8 वर्षे पुणे केली आहेत. हृता लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजिंक्य राऊत 'विठू माऊली' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.