मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचा लवकरच 'डबल एक्सएल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्या दोघीही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशन दरम्यानचा हुमा आणि सोनाक्षीचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. या व्हिडीओत त्या दोघी भांडताना दिसत असून हुमानं सोनाक्षीला कानशिलात लगावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भांडणाचा व्हिडीओत हुमानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत हुमा सोनाक्षीसोबत बसलेली दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला हुमा जादु दाखवत घड्याळगिळते. यानंतर ती तिच्या शेजारी बसलेल्या सोनाक्षी सिन्हाला म्हणते, 'जादू देखोगी?' मग हुमा अचानक सोनाक्षीच्या कानशिलात लगावचे आणि दुसऱ्या हातात असलेल घड्याळ दाखवते. कानशिलात लगावली  हे पाहून सोनाक्षीलाही धक्का बसतो आणि मजामस्तीत हुमाला मारायला सुरुवात करते. (Huma Qureshi Slaps Sonakshi Sinha) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, हुमानं कोणतीही जादुची ट्रिक केली नाही तर तिनं सोनाक्षीसोबत प्रँक केला. त्यांचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत हुमानं कॅप्शन दिलं की, 'मी सोनाला घाबरत नाही, तिच्या चाहत्यांना घाबरते. डबल एक्सल मॅजिक शो मध्ये आपलं स्वागत.' (huma qureshi hilarious prank on as she slams sonakshi sinha video viral) 


हुमा आणि सोनाक्षी यांच्या डबल एक्सल चित्रपटाची कथा दोन मैत्रिणींबद्दल आहे ज्यांना लठ्ठपणाबद्दल लोकांच्या वृत्तीमुळे त्रास होतो. या चित्रपटासाठी हुमा आणि सोनाक्षीनं त्यांचे 15-20 किलोने वजन वाढवले ​​आहे. या चित्रपटात झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे.