मुंबई : महेश्वर येथे चालू असलेल्या 'दबंग ३'चे शुटिंग वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. चित्रीकरणादरम्यान शिवलिंग लाकडी वेष्टनानं झाकल्याचे काही फोटो सोशल मीडियवर व्हायरल झाले आहेत. सलमानने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर सलमानने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने स्वत:ला शिवभक्त असल्याचे सांगितले आहे. जर इकडे शुटिंग करायला मान्याता दिली नाही तर चित्रीकरण दुसऱ्या ठिकाणी करू असे तो म्हणाला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर या वादाचा भडका उठला. त्यानंतर शिवलिंगावर लावलेले लाकडी वेष्टन काढण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्थ आहे. 'दबंग ३' चित्रपयाच्या सेटवरून त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ भलतेच व्हायरल होताना दिसत आहेत. 'दबंग ३' चित्रपटाचे शुटिंग सध्या मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. खरगोन मधील धार्मिक स्थळ असलेल्या महेश्वर येथील सलमानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान साधुंसोबत थिरकताना दिसताना आहे. हा व्हिडीओ महेश्वरच्या आहिल्या फोर्ट वरील आहे. ५ एप्रिल रोजी सुरू झलेली ही शुटिंग १३ एप्रिलला पुर्ण होणार आहे. सलमान तिकडे असल्यामुळे चाहत्यांची प्रचंड गर्दी होत आहे.



नर्मदा नदीच्या घाटावर 'दबंग 3' चित्रपटाच्या शुटिंगचा नारळ फोडण्यात आला आहे. 'दबंग-3' चित्रपटाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. चित्रपटात अभिनेता बॉबी देओल सलमानच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे. 'दबंग-3' चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.