मुंबई - अनेक करामती करूनही माझे नाव कोणीही मीटू #MeToo आंदोलनात घेतले नाही, याबद्दल खरंतर मी स्वतःला भाग्यशाली समजतो. यामुळे मी माझ्या पत्नीने जे काही सांगितले ते ऐकतो आणि कधी कधी तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. जेणेकरून सगळ्यांना हे जाणवावे की मी विवाहित आहे आणि माझे कौटुबिक जीवन व्यवस्थित सुरू आहे, हे उदगार आहेत एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे. एका कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांनी मीटू आंदोलन आणि महिला-पुरुष संबंध या विषयांवर आपली मते मोकळेपणाने मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशी होण्यामागे एक महिला असते. मीटू आंदोलनाची खिल्ली उडविण्यासाठी मी हे विधान करत नाही. पण माझ्या बोलण्याचा अर्थ प्रत्येकाने नीटपणे समजून घेतला पाहिजे. अनेक यशस्वी पुरुषांना बदनाम करण्यामागे त्यांचे यश झाकोळून टाकण्यामागे महिलांचा हात होता, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. अनेक करामती करूनही माझे नाव कोणीही मीटू आंदोलनात घेतले नाही. 


लेखक ध्रुव सोमाणी यांनी लिहिलेल्या 'ए टच ऑफ एव्हिल' या पुस्तकाचे प्रकाशन शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मीटू आंदोलन आणि इतर मुद्द्यांवर स्पष्टपणे आपली मते मांडली.
माझी पत्नी पूनम माझ्यासाठी एखाद्या देवीप्रमाणे आहे. तिच माझे सर्वस्व आहे. मीटू बद्दल मिष्किल टिप्पणी करताना ते म्हणाले की, जरी माझ्याबद्दल कोणाला काही बोलायचे असेल, तरी कृपा करून आता बोलू नका. 


गेल्या वर्षात मीटू आंदोलन राजकीय आणि चित्रपटसृष्टीत विशेष गाजले होते. या निमित्ताने अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारांना वाचा फोडली होती. अनेक दिग्गज लोकांची नावे मीटू आंदोलनात घेतली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.