मुंबई : सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची बातमी  समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. स्वतः सामंथाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती  शेअर केली आहे. मात्र, तेव्हापासून लोकांनी समंथाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी समंथाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने संपूर्ण प्रकरणाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या लोकांना खूप आवडल्या आहेत. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये असं नेमकं काय म्हटलं आहे आणि ती हे का म्हणाली आहे, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरी अभिनेत्रीची ही पोस्ट जुनी असली तरी ही पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सामंथाने ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरी वर एक नोट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानत अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. सामंथाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''माझ्या वैयक्तिक संकटात तुमच्या भावनिक गुंतवणुकीमुळे मी भारावून गेले आहे.


माझ्यावर खूप दयाळूपणा दाखवल्याबद्दल आणि माझ्याबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा आणि कथांपासून माझे संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद. ती पुढे म्हणाली की माझं अफेअर चालू होतं. मला मुलं व्हायला द्यायची नव्हती. मी एक संधीसाधू आहे आणि माझा गर्भपात झाला आहे. असं युजर्सचं म्हणणं आहे. घटस्फोट ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे. यावर मात करण्यासाठी मला एकटं सोडा. माझ्यावरील हे वैयक्तिक हल्ले अत्यंत निर्दयी आहेत. पण, मी वचन देते की तुम्ही मला वाट्टेल ते बोला, पण मी स्वत:ला तोडू देणार नाही.


गेल्यावर्षी समांथाने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे वेगळं होण्याची घोषणा केली होती. सामंथाने या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मी आणि नागा चैतन्यने खूप विचार केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून आम्ही आमच्या मार्गावर पुढे जाऊ शकू. आम्ही नशीबवान आहोत की, आमची मैत्री दशकभराची आहे. जी आमच्या नात्याचा आधार होती. मला खात्री आहे की, हे आमच्यातील एक विशेष बंध कायम राहतील. समंथा आणि नागा चैतन्य 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले होते.


सामंथा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या 'द फॅमिली मॅन 2' वेब सीरिजमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. ज्याला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. समांथाला तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला.