महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी पहिल्यांदाच तिच्या लव लाईफ, भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलली आहे. प्राजक्ता आतापर्यंत तिचं काम, 'प्राजक्तराज' ब्रँड आणि फार्म हाऊसमुळे चर्चेत आली. पण आता पहिल्यांदाच तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं आहे. 


प्राजक्तासाठी काय महत्त्वाचं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ताने नुकत्याच एका मुलाखतीत, आपल्या आयुष्यात शांततेला प्राधान्य असल्याचं सांगितलं. पुढे प्राजक्ता म्हणाली की, 'डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्नच करायचं नाही' पुढे ती म्हणाली की, कारण डोकं ठिकाणावर नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमचा लाइफ पार्टनर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमचं जगणं, भविष्य, मेंटल हेल्थ सगळंच बदलतं. त्यामुळे मला असं वाटतं की, लग्न ही एक रिस्क आहे. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा यावर कुठलंही नातं टिकून असतं. पण या कलियुगात याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. ते नातं जर खरं असेल तरच ते टिकेल. मी प्रेमात पडले. असं नाही की मला कधी प्रेम झालं नाही. पण नंतर मला हे जाणवतं की हे शेवटपर्यंत टिकू शकणार नाही. मग मी त्यातून बाहेर पडते. 



स्वतःला दिला इतका वेळ 


आपण थांबूया असं मी स्वतःलाच पाच वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. तो माझ्याशी खोटं बोलायचा. मी त्याचं खोटं पकडलंदेखील होतं. पण तो ते मान्य करतच नव्हता. तुमच्यात खरं बोलण्याचीही हिंमत पाहिजे.' अतिशय मोकळेपणाने बोलली प्राजक्ता माळी.


प्राजक्ताच्या कामाबद्दल 


प्राजक्ता माळीने अनेक मालिका, सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. तसेच 'प्राजक्तराज' हा तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे. एवढंच नव्हे तर प्राजक्ता 'पांडू', 'चंद्रमुखी', 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह', 'खोखो', "व्हाय' यासारख्या सिनेमात काम केलंय. एवढंच नव्हे तर तिने 'रानबाजार' या सीरिजमध्येही काम केलं आहे.