मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरु आहे. ज्यामध्ये बॉलिवूड कलाकारांच्या लहानपणीचे फोटो व्हायरल होतात. ज्यामध्ये चाहत्यांना या स्टार्सना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जात. सध्या असाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही एक लहान मूलगा आहे. ज्याने त्याच्या डोक्यावर वडिलांची पोलिस टोपी घातलेली दिसत आहे. मात्र यावेळी या चिमुकल्याला हे माहिती नव्हतं की, एक दिवस असे अनेक पोलीस अधिकारी त्याला सलाम करतील. आज हा लहान मूलगा संपूर्ण जगावर राज्य करत आहे. या मुलाने प्रत्येक घरात स्वतःची एक खास वेगळी ओळख निर्माण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी या मुलाला देवाचा दर्जाही दिला आहे. लोकप्रियता आणि स्टारडमबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडचे अनेक मोठे सेलिब्रिटीही या मुलाचे चाहते आहेत. पण डाऊन टू अर्थ प्रवास या मुलासाठी इतका सोपा नव्हता. वडिलांच्या निधनानंतर लहानपणीच या मुलाच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. या मुलाने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली.


जर तुम्ही अजूनही या मुलाला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ईथे आम्ही सर्वांच्या आवडत्या टीव्ही स्टारबद्दल बोलत आहोत. जो एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. आता तर तुम्हाला कल्पना आलीच असेल की, आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. जर तुम्हाला अजूनही या चिमुकल्याला ओळखता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की,  हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आहे.


सर्वांना पोटधरुन हसवणारा कपिल शर्मा आज करोडो रुपयांचा मालक आहे. पण एक काळ असा होता की, तो फक्त 500 रुपयांवर जगायचा. त्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. वडिलांच्या अनुपस्थितीमुळे त्याच्याकडे बहिणीच्या लग्नासाठीही पैसे नव्हते.


अमृतसर येथील रहिवासी असलेल्या कपिल शर्माने पहिल काम फोन बूथमध्ये केलं. येथे काम करण्यासाठी त्याला 500 रुपये मिळायचे. ही त्याची पहिली कमाई होती. याशिवाय एका कापड गिरणीतही त्याने काम केलं, ईथे त्याला ९०० रुपये मिळाले.



पण एका कॉमेडी शोने त्याचं नशीब बदललं. जेव्हा त्याने पहिल्यांदा ऑडिशन दिलं तेव्हा त्याला नकार देण्यात आला. त्यानंतर तो या शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता ठरला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि हळूहळू तो यशाची शिडी चढत गेला. आज त्याचा रियालिटी शो 'कपिल शर्मा शो' आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला आहे. त्याचा शो पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. जर आपण आज त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर तो सुमारे 300 कोटी रुपयांचा मालक आहेत.