मुंबई : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) (CBDT) ने गुरूवारी असा दावा केला आहे की, आयकर विभागाद्वारे दोन फिल्म निर्माण कंपनी आणि एका अभिनेत्रीवर (Anurag Kashyap, Taapsee Pannu) छापा मारण्यात आला. बुधवारी सकाळी छापा मारल्यानंतर आयकर विभागाची कारवाई रात्री उशिरापर्यंत संपली. यावेळी मुंबई आणि पुण्यात चौकशी करण्यात आली. यानंतर गुरूवारी देखील छापा मारण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांच्या या छापेमारीत 650 करोड रुपयांच्या (IT Dept claims Rs 650 cr discrepancies) आर्थिक अनियमिततेची माहिती मिळाली आहे. यामध्ये अद्याप कुणाचं नाव घेण्यात आलेलं नाही. बुधवारी अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी फँटम फिल्मच्या विरोधात टॅक्स चोरीच्या आरोपाखाली करण्यात आली आहे. 


कुठे झाली छापेमारी? 


महत्वाची बाब म्हणजे ही छापेमारी मुंबई, पुणे आणि हैद्राबाद अशी 30 ठिकाणी करण्यात आली. यामध्ये कलाकार, प्रतिभा प्रबंधन कंपनी केडब्ल्यूएएन आणि ऍक्सीडच्या काही अधिकाऱ्यांच्या समावेश होता. (Income Tax Raid : अनुराग आणि तापसीच्या अडचणींमध्ये वाढ; चौकशीत मोठा खुलासा) 


 


छापेमारीनंतर सीबीडीटीने काय म्हटलं?


छापेमारी कारवाईच्या एख दिवसानंतर कुणाचं नाव न घेता सीबीडीटीने सांगितलं की, ज्या कंपन्यांमध्ये तपास केला त्या कंपना फिल्म, वेब सीरिज, अभिनय, दिग्दर्शक याच्याशी संबंधित आहे. याच्याशी संबंधित अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, निर्माता विकास बहल आणि निर्माता मधू मंटेना यांची चौकशी झाली. 


छापेमारीत आयकर विभागाला मिळाला महत्वाच्या गोष्टी 


सिनेमा निर्मितीशी जोडलेल्या दुसऱ्या कंपनीवर छापे मारले त्यामध्ये अनुराग कश्यप यांचा संबंध आहे. सीबीडीटीने सांगितलेल्या माहितीमध्ये बॉक्स ऑफिसवरील सिनेमाच्या कमाईच्या तुलनेत या कंपनीनेने आयकर विभागाला अतिशय कमी माहिती दिली आहे. यामाहिती फिल्म दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये काही हेरफेर झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 350 करोड रुपयांचा कर अनैच्छिक आहे. या प्रकरणाची पुढे चौकशी केली जाईल. 


सीबीआयचा दावा 


सीबीआयचा असा दावा आहे की, लोकप्रिय अभिनेत्री तापसी द्वारे पाच करोड रुपयांचो रोख रक्कम प्राप्त केली आहे. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.