अक्षय कुमारमुळे गेला होता बॉलिवूडचा `हा` प्रसिद्ध अभिनेता डिप्रेशनमध्ये? कारण जाणून बसेल धक्का
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनेत्याने करिअरमध्ये आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याच्यामुळे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता डिप्रेशनमध्ये गेला होता.
Randeep Hooda Depression : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अभिनेत्याने नुकताच स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच त्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, काही काळापूर्वी तो डिप्रेशनचा शिकार झाला होता. त्याने त्याच्या डिप्रेशनचं कारण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार असल्याचं म्हटलं आहे.
जेव्हा अक्षय कुमारमुळे रणडिप हुड्डा डिप्रेशनमध्ये गेला होता
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने याचा खुलासा केला. रणदीपने सांगितलं की, 2016 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या 'बॅटल ऑफ सारागढी' चित्रपटाची घोषणा झाली होती. या चित्रपटात रणदीप मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, 2018 साली अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाची घोषणा झाली आणि त्याच वर्षी हा चित्रपटही प्रदर्शित झाला. दोघांची कथा एकाच मुद्द्यावर आधारित होती. पण 'केसरी'च्या अपयशामुळे रणदीपचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला नाही. यामुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये होता.
जेव्हा 3 वर्षांची मेहनत वाया गेली
अभिनेत्याने सांगितलं की, 'चित्रपट बनवण्यासाठी 3 वर्षे लागली. या प्रोजेक्टसाठी मी खूप मेहनत घेत होतो. चित्रपटात ईशर सिंगची भूमिका साकारण्यासाठी मी या तीन वर्षांत केस आणि दाढी वाढवली होती. या काळात मी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलो. जणू कोणीतरी माझा फार मोठा विश्वासघात केला आहे असं तेव्हा मला वाटत होतं.
चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे रणदिप हुड्डावर याचा खूप परिणाम झाला होता. त्याने सांगितलं की, कोणीतरी आपली दाढी कापेल या भीतीने तो खोलीत स्वत:ला कोंडून घ्यायचा. अभिनेता पुढे म्हणाला की, 'माझ्या आई-वडिलांनी मला कधीच एकटं सोडलं नाही. या गोष्टीचाही माझ्यावर परिणाम होऊ लागला होता. मग मी ठरवलं की, मी माझ्यासोबत असं पुन्हा कधीही होऊ देणार नाही.
रणदीप हुडाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्यानं 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मानसून वेडिंग' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन मीरा नायर यांनी केलं होतं. या चित्रपटात रणदीप हुड्डानं एका NRI ची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यानं रामगोपाल वर्मा यांच्या डी या चित्रपटात देखील काम केले होते. रणदीप 'डरना जरूरी है', 'हायवे', 'रिस्क', 'रूबरू' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.अभिनेता लवकरच 'वीर सावरकर'मध्ये दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. रणदीपनं त्याच्या करिअरमध्ये आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानं अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी देखील त्याच्या खासगी आयुष्याची नेहमीच चर्चा रंगली आहे.