मुंबई : 'विरासत' फेम अभिनेत्री पूजा बत्रा हिच्यासोबत लग्नबंधानात अडकलेल्या नवाब शाह याने त्याच्या आयुष्यातील या सुखावह वळणाविषयी माध्यमांशी संवाद साधतना आनंद व्यक्त केला आहे.  लग्नानंतर पहिल्यांदाच नवाब शाहने पूजासोबतच्या त्याच्या वैवाहिक नात्यावरुन पडदा उचलला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४ जूलै २०१९ रोजी पूजा आणि नवाबने एका खासगी विवाहसोहळ्यात लग्न केलं. दिल्लीमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला त्यांच्या निकटवर्तीयांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच नवाबने सोशल मीडियावर पूजासोबतचा फोटो पोस्ट करत त्याच्या आयुष्यातील सुरेख नात्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आता नवाबने या नात्याविषयी आणखीही बाबी सर्वांसमोर मांडल्या आहेत. 


'आयुष्याच्या या वळणावर मी पूजा सोबत रिलेशनशिपमध्ये राहीन हा विचारसुध्दा कधी केला नव्हता. माझ्या आयुष्यात पूजा आल्याने एका बहर आला होता. जेव्हा मी पूजाला पहिल्यांदा भेटलो तेव्हाचं मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली होती. पूजा चांगली व्यक्ती असून, ती माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्याच्या घडीला आम्ही आयुष्याच्या या वळणावर आहोत की, या नात्याविषयी आम्ही कुठलीही साशंकता कर शकत नाही', असं म्हणत नवाबने या नात्याप्रती असणारा विश्वास व्यक्त केला. 



नवाबआधी पूजानेही 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'हो आम्ही लग्न केलं. दिल्लीमध्ये नवाबने आणि मी लग्नगाठ बांधली. कुटुंब आणि जवळच्या मित्रांची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती', असं ती म्हणाली. जवळच्या व्यक्ती, आम्हाला लग्नाला आम्ही उशीर का करत आहोत, असंच विचारत होते असा खुलासा तिने केला होता. आपण फक्त प्रवाहासोबत जात होतो. पण, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मी उर्वरित आयुष्य व्यतीत करु इच्छिते आणि आता त्यासाठी आता आणखी दिरंगाई करण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणत आर्य पद्धतीने लग्न केल्याची माहिती तिने दिली.