`ज्युली २` फेम अभिनेत्री ‘राय लक्ष्मी’ लवकरच मराठी सिनेमात
गेल्या कित्येक दिवसांपासून `ज्युली २` हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत आला. पण आता
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून 'ज्युली २' हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत आला. पण आता
'ज्युली २' या सिनेमातील अभिनेत्रा राय लक्ष्मी ही चर्चेत आली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. राय लक्ष्मी लवकरच मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे. राय लक्ष्मी पुण्याच्या भेटीला गेली असता तिने पत्रकार परिषदेत सांगितले की, ती मराठी सिनेमांच्या प्रेमात पडली आहे.
कोण आहे 'राय लक्ष्मी'?
आता पर्यंत ५० हून जास्त दक्षिणेतील चित्रपट झळकलेली राय लक्ष्मी आता मराठी सिनेमांच्या प्रेमात पडली आहे.मुळात ती दाक्षिणात्या सिनेमात काम करत असली तरीही ती महाराष्ट्रीयन असून ती मुंबईत राहते. त्यामुळे राय लक्ष्मीला मराठी भाषेवर चांगले प्रभुत्त्व आहे.ती उत्तम मराठी बोलते. मराठी सिनेमा संवेदनशील असतात. अशा संवेदनशील सिनेमाचा आपण ही भाग असाव असं तिला वाटले आणि म्हणून मराठी सिनेमा करण्याचा निर्धार तिने केल्याचे सांगितले.
तिचा सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी हे वितरक व दीपक शिवदासानी दिग्दर्शक असलेला 'जुली-२' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तेव्हा पासून या सिनेमाची चर्चा होती.
'जुली २' हा ‘जुली’ सिनेमाचा सिक्वल नसल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.या सिनेमाचे कथानक चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींच्या संघर्षावर आधारित आहे.आता पर्यंत दाक्षिणात्या सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी राय लक्ष्मी जुली 2 सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.एका सामान्य तरुणीचा अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास 'जुली २' या सिनेमात दाखवण्यात आला आहे.अभिनय करण्यासाठी करावा लागणारा संघर्षही या सिनेमात पाहायला मिळणार आहे.