`ती भेटली तर मिठी मारेल...`, आजही समंथावर प्रचंड प्रेम करतो नागा चैतन्य?
आपण ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपण कधीच विसरु शकत नाही... समंथाबद्दल नागा चैतन्याने व्यक्त केलेल्या भावाना चर्चेत
मुंबई : कलाविश्वात आतापर्यंत अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेत नात कायमच संपवलं. अशा कपलपैकी एक म्हणजे अभिनेता नागा चौतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यांच्या निर्णयाचा चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दरम्यान नागा चैतन्या आणि समंथाने त्यांच्या नात्याबद्दल दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' शोमध्ये मोठे खुलासे केले.
शोमध्ये करणने नागा चैतन्यला 'पहिली पत्नी समंथा रुथ प्रभूला भेटल्यावर तुझी प्रतिक्रिया कशी असेल?' असा प्रश्न विचारला. यावर नागा म्हणाला, 'मी कधी तिला भेटलो तर, तिला Hi बोलेल आणि मिठी मारेल...' असं अभिनेता म्हणाला.
याआधी करणने शोमध्ये समंथाला, 'नागासाठी तुझ्या मनात हार्ड फिलिंग्स आहेत का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'होय, हार्ड फिलिंग्स आहेत आहेत. जर तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केले तर तुम्हाला आमच्यापासून धारधार गोष्टी लपवाव्या लागतील. सध्या परिस्थिती चांगली नाही. कदाचित भविष्यात काहीतरी बदलेल.' असं देखील समंथा म्हणाली.
जेव्हा एका मुलाखतीत नागाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा अभिनेता अस्वस्थ असल्याचं समोर आलं. तेव्हा नागा म्हणाला, 'मी एक अभिनेता आहे. म्हणून मला वाटतं की लोकांनी माझ्याबद्दल बोलावं. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करू नये. आपल्या प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं... असं नागा चैतन्य म्हणाला.