करिनाला हा प्रश्न विचारलात तर सॅण्डल पडेल- सैफ अली खान
करीनाच्या सिनेमातील वापसीबद्दल सैफने मीडियासमोर असे काही सांगितले की सर्वजण हैराण झाले.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान त्याचा आगामी सिनेमा 'कालाकांडी' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या परिवारासाठीही हे वर्ष महत्त्वपूर्ण असणार आहे.
त्याची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून डेब्यू करत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करीनादेखील 'वीरे दी वेडिंग' सिनेमात दिसणार आहे.
करीनाच्या 'वीरे दी वेडिंग' सिनेमाला घेऊन सैफ उत्साही आणि तेवढाच चिंतित पण आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिना आपल्या फिटनेसबद्दल चिंतित दिसली.
तिला लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचेय अशी चर्चा आहे. करीनाच्या सिनेमातील वापसीबद्दल सैफने मीडियासमोर असे काही सांगितले की सर्वजण हैराण झाले.
सॅण्डलही फेकून मारेल
न्यूज एजंसी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, करिनाच्या कमबॅकला घेऊन पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावर सैफने त्याला अर्धवट थांबविले.
'जर तुम्ही हा प्रश्न तिला विचारलात तर ती तुम्हाला नक्कीच काही ना काही फेकून मारेल, कदाचित ती सॅण्डलपण असू शकते. तिच्याकडे नेहमी अशा गोष्टी असतात.' असे तो म्हणाला.
करिनाची तारीफ
सैफने मीडियासमोर करीनाची खूप तारीफ केली. ती एक चांगली कलाकार असून आपली हेल्थ आणि फिटनेसला घेऊन नेहमी चिंतित असते असेही तो म्हणाला.